शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

रस्त्याच्या रुंदीकरणातील ४३२ झाडांना नवसंजीवनी

By admin | Published: January 18, 2016 3:14 AM

ठाणे महापालिकेने पोखरण रोड नं. १ च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे, मात्र या रस्त्याच्या आड ४३२ झाडे येत आहेत. या झाडांना

ठाणे : ठाणे महापालिकेने पोखरण रोड नं. १ च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे, मात्र या रस्त्याच्या आड ४३२ झाडे येत आहेत. या झाडांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या झाडांवर कुऱ्हाड चालविण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. नरिमान पॉइंट, पुणे-नाशिक हाय वे, मुंबई एअरपोर्टच्या कामामुळे बाधित झालेल्या हजारो झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या क्रिएटिव्ह ग्रुपकडे हे काम सोपविण्यात आले असून या झाडांना नवसंजीवनी देण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.पोखरण येथील हा २४ फूट रुंद असलेला रस्ता ४० फूट रुंद केला जाणार आहे. या मार्गात येणारी बांधकामे पालिकेने कोणत्याही वादंगाशिवाय जमीनदोस्त केली आहेत. रुंदीकरणात ४३२ झाडेसुद्धा बाधित होणार आहेत. रस्त्यांसाठी बाधित होणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवून त्या मोबदल्यात अन्यत्र नव्या झाडांची लागवड करण्याची प्रथा पालिकेत आहे. मात्र, आता या रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या झाडांचे अद्ययावत पद्धतीने पुनर्राेपण करण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. पुनर्रोपणाची गेल्या काही वर्षांपासून राबविली जाणारी पद्धत सदोष असल्याने त्यात अपेक्षित यश मिळत नव्हते. मात्र, क्रिएटिव्ह ग्रुपने पुनर्रोपणाचे नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्याचे यश हे ९० टक्क्यांपर्यंत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे त्यांना हे काम देण्यात आल्याची माहिती शहर विकास विभागामधील अधिकारी प्रमोद निंबाळकर यांनी दिली.अर्बन लॅण्डस्केप प्लॅनिंग या विषयात पीएच.डी. केलेले डॉ. राजीव चवाथे यांनी झाडांचा तंत्रशुद्ध अभ्यास करून पुनर्रोपणाची पद्धत विकसित केली आहे. या संस्थेने मुंबई एअरपोर्टच्या विस्तारीकरणामुळे बाधित झालेल्या ३५०० झाडांचे स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (साई) प्रांगणात यशस्वी पुनर्रोपण केले आहे. त्याशिवाय, मरिन ड्राइव्हवरील १६३ नारळांच्या झाडांना ओव्हल मैदानात नवसंजीवनी दिली आहे. एमएमआरडीएचे अनेक प्रकल्प आणि पुणे-नाशिक हाय वेच्या रुंदीकरणातील वृक्ष पुन्हा जगविण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. तेच तंत्रज्ञान ठाण्याच्या बाबतीतही राबविले जाणार असल्याची माहिती चवाथे यांनी दिली. (प्रतिनिधी)