ठाणे - ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्ष सद्यस्थितीत हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. एकीकडे प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गरदोर मातांची संख्या जास्त आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात कमी असलेल्या बेडच्या संख्येमुळे अक्षरश: प्रसूतीनंतर मातांसह त्यांच्या नवजात बाळांवर जमिनीवर टाकलेल्या गाद्यांवर उपचार करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावरओढवली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून बेडची संख्या वाढण्याची मागणी होत असताना प्रसूतीसाठी येणाºया रुग्णांना घ्यावे की घेऊ नये अशी मनस्थिती तेथील डॉक्टर आणि कर्मचाºयांची झाली आहे.गोरगरीब रु ग्णांचे म्हणून जिल्हा सामान्य रु ग्णालयाकडे पाहिले जाते. या रु ग्णालयात जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. सध्याच्या घडीला या रु ग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासलेले आहे.रुग्णालयातील विविध कक्षातील स्लॅब तसेच प्लास्टर कोसळणे, इमारतीचा सज्जा पडणे अशा अनेक घटना घडत आहेत. दरम्यान, रुग्णालय स्थलांतराच्या हालचाली जोरदार सुरू आहेत. त्यातचरु ग्णालयातील एक महत्त्वाचा विभाग म्हणून प्रसूती कक्षाकडे पाहिले जाते. सध्याच्या घडीला हा कक्ष हाऊसफुल्ल झाला आहे.जिल्हा सामान्य रु ग्णालयातील मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक विभाग असून तेथे ३० बेड आहेत. तर,तळ मजल्यावर असलेल्या दुसºयाविभागात १४ असे एकूण ४४ बेड आहेत. मात्र त्या तुलनेत येथे दाखल असलेल्या गरोदार मातांची संख्या ही ९४ च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागात अक्षरश: बेडच्या बाजूला गाद्या,अंथरुण तेथे मातांसह त्यांच्या नवजात बाळांना झोपवले जात आहे. दरम्यान, तळ मजल्यावर असलेल्या प्रसूती कक्षात चार ते पाच महिन्यांपूर्वी प्लास्टर कोसळल्यामुळे त्या विभागाच्या समोर रिकाम्या असलेल्या खोलीत या विभागाचे स्थलांतर केल्याने त्या ठिकाणीदेखील अनेक गैरसोयींचा सामना येथील कर्मचाºयांना काम करावा लागत आहे. त्यामुळे निदान प्रसूती कक्षाला तरी योग्य व पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर मातांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.रूग्णालय प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी तसेच सरकारने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी रूग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी या परिसरातील प्रसूतीसाठी रुग्णालयात येणाºया रुग्णाची संख्या जास्त आहे. त्यातच ग्रामीण तसेच इतर बाहेरून येणाºया रु ग्णांची परवड होऊ नये. यासाठी त्यांना दाखल करून घेतले जाते. त्यामुळेच ही संख्या वाढल्याचे सध्या दिसते. - डॉ. कैलास पवार,जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रु ग्णालय ठाणे.
जिल्हा रुग्णालयात नवजात बालके जमिनीवर, ४४ खाटा अन ९४ गरोदर माता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 2:58 AM