शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

दोन जेटींसाठी ४४ कोटींचा निधी

By admin | Published: May 12, 2017 1:38 AM

मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात असलेल्या उत्तनमधील भातोडी व पातान बंदरांत

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन व मनोरंजन क्षेत्रात असलेल्या उत्तनमधील भातोडी व पातान बंदरांत जेटी बांधण्यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा,अशी मागणी महापौर गीता जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ती मागणी राज्य सरकारने मान्य केली असून या जेटीसाठी प्रत्येकी २४ व २० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. उत्तन येथील भातोडी व पातान बंदरांजवळ वास्तव्य करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात मासेमारी करण्यास जाण्यासाठी चौक येथील जेटीचा वापर करावा लागतो. या ठिकाणी सुमारे अडीचशे ते तीनशे मासेमारी बोटी चौक जेटीकडेच येजा करत असतात. परंतु, या जेटीकडे जाण्यासाठी मच्छीमारांना मोठा वळसा घालून जावे लागते. कारण, तेथील समुद्रकिनारी मोठे खडक असल्याने तेथे जेटीची सुविधा नाही. त्यामुळे चौकची जेटीच भातोडी व पातानबंदरांच्या मच्छीमारांना तूर्त सोयीची ठरत आहे. मात्र, स्थानिकांनी ती गैरसोयीचीच ठरत असल्याचा दावा केला आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी त्या दोन्ही बंदरांजवळच जेटी बांधून स्थानिक मच्छीमारांची सोय करा, अशी मागणी भातोडी व पातानबंदर परिसरातील मच्छीमारांनी महापौरांकडे केली होती. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत आले असता महापौरांनी त्यांच्याकडे जेटीची लेखी मागणी केली होती. हा विषय मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत येत असल्याने महापौरांनी काही दिवसांपूर्वी मत्स्यविभागमंत्री महादेव जानकर यांची भेट घेतली. त्यावेळी जानकर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना जेटीचे अंदाजपत्रक व आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. जेटीचे अंदाजपत्रक व आराखडा नुकताच सादर करण्यात आल्याने त्याला मान्यता दिल्याचे विभागाने स्पष्ट केले.