सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठी उद्यापासून सरळ सेवा भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. राज्यात एकाच वेळी होत असलेल्या आँनलाईन लेखी परीक्षेला ठाणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्र निवडलेले तब्बल 457 परीक्षार्थी शनिवारी लेखी परीक्षा देत आहेत. पवई आणि नवी मुंबईतील भारती विद्यापीठ या दोन परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जात आहे.
ठाणे अंतर्गत गट - क सरळ सेवा भरतीसाठी ही लेखी परीक्षा सुरू आहे. शनिवार पासून या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरतीत विविध संवर्गातील एकूण 255 पदांची भरती होणार आहे. उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 7 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. या सरळ सेवा भरती परिक्षेच्या पहिल्या दिवशी रिगमन दोरखंडवाला व वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची परीक्षा घेण्यात येत आहे.8 ऑक्टोबर रोजी विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा एका दिवसात तीन सत्रात होणार आहे. यासठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांना खास प्रशिक्षण दिलेले आहे.