ठाणे : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत आठवड्यापासून एक हजार पेक्षा अधिक रुग्णाओची घट होताना दिसून येत आहे. मंगळवारी चार हजार ५९९ रुग्ण आढळले असून ४९ जण दगावल्याने चिंतेत भर पडली आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या चार लाख २५ हजार ९८७ झाली असून सात हजार ३१ मृतांची नोंद केली आहे.
ठाणे परिसरात एक हजार २९४ रुग्ण आज आढळल्याने या शहरात आतापर्यंत एक लाख आठ हजार ९०८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर आठ मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या एक हजार ५६७ झाली. कल्याण - डोंबिवलीत एक हजार १६० ने रुग्ण संख्या वाढले असून सहा मृत्यू झाले आहे. या शहरात आता एक लाख आठ हजार ७४४ बाधीत असून एक हजार एक हजार ३३५ मृतांची नोंद केली आहे.
उल्हासनगरला १४१ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. आता या शहरात १७ हजार ५५५ बाधीत असून मृत्यू संख्या ४०१ आहे. भिवंडीला ६० रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथे नऊ हजार ३२१ बाधितांची तर, ३८१ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५५५ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू झाले आहेत. या शहरात आता ३८हजार ८९० बाधितांसह ९३५ मृतांची संख्या आहे.
अंबरनाथ शहरात १९१ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू झाले आहेत. या शहरात आता १५ हजार ७११ बाधितांसह मृतांची संख्या ३४८ आहे. बदलापूरला २१५ रुग्ण आढळले. त्यामुळे बाधीत रुग्ण १६ हजार ७१७ असून आठ मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १४१ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १२३ रुग्ण सापडले असून चार मृत्यू आहे. या गांवपाड्यांत २३ हजार ६५६ बाधीत झाले असून मृत्यू ६३८ नोंदले गेले आहेत.