लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबई - नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरुन महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या ४६ लाख ५६ हजारांच्या विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने शुक्रवारी जप्त केला. या कारवाईमध्ये टेम्पो चालक राजेश यादव (३५) याला अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची उत्पादन शुल्कची कोठडी मिळाली आहे.ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील कसारा येथून जाणाºया मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंदा कांबळे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ८ जानेवारी २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास पाळत ठेवून दादरा व नगर हवेली या राज्यामध्ये विक्र ीसाठी असलेला परंतू महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या आणलेला विदेशी मद्याचा साठा एका टेम्पोचा थरारकरित्या पाठलाग करुन जप्त केला. या टेम्पोमधून एका नामांकित कंपनीच्या मद्याचे १८० मिलीचे २०० बॉक्स अन्य एका कंपनीचे १८० मिलीचे २२५ बॉक्स असे ४४५ बॉक्स मद्य आढळल्याने चालक यादव याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून या टेम्पोसह मद्य साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक आनंदा कांबळे, दुय्यम निरीक्षकअनिल राठोड, अनंता पाटील आणि जवान केतन वझे, राजेंद्र शिर्के, अविनाश जाधव, सुदाम गिते, सदानंद जाधव आणि वैभव वामन आदींच्या पथकाने पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीमध्ये ४६ लाख ५६ हजारांचे विदेशी मद्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 11:26 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंबई - नाशिक महामार्गावरील नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरुन महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेल्या ४६ लाख ५६ ...
ठळक मुद्दे टेम्पो चालकाला अटकठाण्याच्या शहापूरजवळ मोठी कारवाई