शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मोबाइल व्हॅनद्वारे ४६ लाखांचा कर वसूल, ठामपाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 12:10 AM

Thane News : नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ताकर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाइल व्हॅनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठाणे - कोरोनाच्या काळात ठाणेकारांना मालमत्ताकर भरण्यास सुलभ व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकने मोबाइल व्हॅनचा आधार घेतला आहे. त्यानुसार मागील दीड महिन्यात ३७० नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून, त्या माध्यमातून ४६ लाखांचा मालमत्ताकर वसूल झाला आहे.नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ताकर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाइल व्हॅनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. करदात्याच्या दारी जाऊन कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने स्मार्ट कर संग्रह प्रणाली ही मोबाइल व्हॅन तयार केली आहे. ती पूर्णत: रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या प्रमाणकानुसार असून संगणक, प्रिंटर व त्याकरिता लागणाऱ्या सर्व सुविधा तसेच ऑपरेटर, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षकही त्यात आहे. याबाबतचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्रने केला आहे. या व्हॅनद्वारे एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मालमत्ताकर वसूल करावयाचा असल्यास ती त्या प्रभाग कार्यालयाकडे पाठविण्यात येते. या व्हॅनद्वारे करदात्यांनी देयकाची मागणी केल्यास तेसुद्धा देण्यात येत आहे. यामध्ये मालमत्ताकर रोखीने, धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, एटीएम कार्डनेदेखील भरण्याची व्यवस्था आहे. पावती देण्याची व्यवस्थाही व्हॅनमध्ये आहे.१५ ऑक्टोबरपासून या उपक्रमाला सुरुवात केली असून ती ९ प्रभाग समित्यांमध्ये फिरत आहे. या व्हॅनच्या माध्यमातून आतापर्यंत ३७० नागरिकांनी आपल्या मालमत्ताकराचा भरणा केला असून, याचा सर्वाधिक फायदा हा सिनियर सिटीजनना झाला आहे. बऱ्याच नागरिकांना ऑनलाइन मालमत्ताकर भरता येत नसून दुसरीकडे कोरोना काळात कार्यालयात जाऊन तो भरणे शक्य नसल्याने हा उपक्रम चांगलाच उपयोगी पडला आहे. 

सुटीच्या दिवशीही कॅम्पएखाद्या गृहनिर्माण संस्थेने मालमत्ताकर भरण्याकरिता व्हॅनची मागणी केल्यास ती संबंधित गृहनिर्माण संस्थेमध्ये पाठवून कराचे संकलन करण्यात येत आहे. सुटीच्या दिवशी अथवा इतर दिवशी संस्थेमध्ये कॅम्प राबविण्यात येत असून या वसुलीसाठी मोबाइल व्हॅनचा उपयोग होत आहे.

टॅग्स :TaxकरThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका