शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

‘समृद्धी’लगतची ४६ गावे एमएसआरडीसीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 8:43 AM

ठाण्यातील आमणे परिसरासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती

अमर शैलालाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समृद्धी महामार्गाला सुरुवात होणाऱ्या ठाण्यातील आमणे भागातील ४६ गावांची ‘आमणे नोड अधिसूचित क्षेत्र’ म्हणून घोषणा केली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास सोमवारी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गालगतचा भिवंडी परिसरातील सुमारे ११५ चौरस किमी भाग आता एमएसआरडीसीच्या अधिपत्याखाली आहे.

भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस उभे राहिले आहेत. या भागाच्या नियोजनबद्ध आणि संतुलित विकासाची जबाबदारी आता एमएसआरडीसीवर सोपविण्यात आली आहे. नगरविकास विभागाने त्याचा शासन निर्णय जारी केला असून, एमएसआरडीसीला भिवंडी तालुक्यातील ३२ गावे आणि कल्याण तालुक्यातील १४ गावे मिळून सुमारे ११ हजार ५०० हेक्टर भागासाठी प्रारूप विकास योजना तयार करून त्याची विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे. 

समृद्धी महामार्गासह, प्रस्तावित विरार अलिबाग बहुद्देशीय मार्ग, दिल्ली मुंबई महामार्ग हे या परिसरातून जातात. तसेच भविष्यात येथून जेएनपीटीसह वाढवणमधील प्रस्तावित बंदराला मालाची वाहतूक होणे अपेक्षित आहे. त्यातून परिसरात लॉजिस्टिक हब आणि वेअर हाऊसचा सुनियोजित विकास होणे आवश्यक आहे. त्यातून एमएसआरडीसीची या भागासाठी नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी भिवंडीतील काही 

गावांमध्ये औद्योगिक विकास केंद्र प्रस्तावित होते. त्यामुळे या गावांसाठी एमआयडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली होती. राज्य सरकारने एमआयडीसीची नेमणूक रद्द करून ही गावे एमएसआरडीसीला दिली आहेत.

कोणत्या गावांचा समावेश भिवंडी तालुका : आमणे, आतकोली, अर्जुनाली, बापगाव, भादाने, भवाले, भोईरगाव, बोरीवली तर्फ सोनाळे, चिराडपाडा, देवरुंग, ईताडे, जानवल, खांडवल, किरवली तर्फे सोनाळे, कुकसे, लोनाड, मुथवल, नांदकर, पडघा (सिटी), पिसे, सांगे, सापे, सावड, शिवनगर, तळवली तर्फे सोनाळे, उसरोली, वाहुली, वाशेरे, आन्हे, बोरीवली तर्फे राहूर, कुरुंद आणि वांद्रे कल्याण तालुका : गुरवली, खडवली, कोंडेरी, नाडगाव, निंबावली, ओझरर्ली, राये, सांगोडे, वासुंद्री, आंबिवली तर्फे वासुंद्री, चिंचवली, मोस, पितांबरेनगर आणि उटणे  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग