ठाणे : ठाणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ६६४ रुग्णांची नोंद झाली असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. या जिल्ह्यात आता ४ लाख ३० हजार ६५१ रुग्णांची नोंद झाली. तर मृतांची संख्या ७ हजार ७८ झाला आहे.आजच्या ४७ दगावणाऱ्यांपैकी प्रत्येकी १० रुग्ण हे ठाणे आणि मीरा-भाईंदर या महापालिकेच्या हद्दीतील असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे शहर परिसरात १ हजार २६६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ९ हजार ९३६ झाली आहे. शहरात १० मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ५७७ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीतही १ हजार १९२ रुग्णांची वाढ झाली असून ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ८४० रुग्णांची वाढ झाली असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १३४ रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ६३ बाधीतांची नोंद झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये ५२६ रुग्ण आढळले असून १० जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २३३ रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहेत. बदलापूरमध्ये १८१ रुग्णांची नोंद झाली असून चौघे दगावले आहेत. तर ठाणे ग्रामीणमध्ये २२९ नवे रुग्ण वाढले असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.