ठाणे : मोडकळीस आलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मल्टीस्पेशल हॉस्पिटल होण्याच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. येत्या महिन्याभरात या रुग्णालयाचे भुमीपुजन केले जाणार आहे. परंतु या रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ७१ वृक्षांचा अडसर देखील आता दूर होणार आहे. केवळ २ वृक्ष हे हेरीटेज स्वरुपात मोडत असल्याने त्या वृक्षांचे काय करायचे या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या वृक्ष कमिटीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. उर्वरीत ७१ पैकी २२ वृक्ष या ठिकाणचे वाचणार असून शिल्लक ४७ वृक्ष तोडले जाणार असून त्यांच्या बदल्यात मनोरुग्णालयाच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयाच्या परिसरात नवीन वृक्ष लावले जाणार आहेत.
ठाणे जिल्हा रुग्णालयाची सध्याची क्षमता ३०० खाटांची असून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण रूग्णसंख्या दाखल होण्याचा वेग पाहता या जागी दोन बेसमेंट अधिक तळमजला धरून ५७४ खाटांचे सहा मजली स्पेशालिटी उभारण्याला १३ जून २०१९ साली ३१४.११ कोटी रूपयांची मंजूरी मिळाली होती. परंतू नंतर याठिकाणी ९०० खाटांचे १० मजली रु ग्णालय आणि १० परिचारीका प्रशिक्षण केंद्र आण वस्तीगृहाचा आराखडा तयार करण्यात येऊन या संकल्पचित्नाला ९ एप्रिल २०२१ रोजी मान्यता मिळाली असल्याचे कार्यकारी अभियंता पाटील म्हणाले. १३ जून २०१९ पासून जिल्हा रु ग्णालयाचा सुपर स्पेशालिटी रूग्णालयाच्या बांधकामाचा सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्यात आला आहे.
येथील अनेक विभाग मनोरुग्णालया येथील नवीन वास्तुत हलविण्यात आले आहेत. तसेच विविध स्वरुपाच्या परवानग्या देखील घेण्याचे काम युद्ध पातळीवर आले आहे. त्यानुसार आता महापालिकेकडे येथे बाधीत होणाऱ्या ७१ वृक्षांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यातील २२ वृक्ष वाचणार असून उर्वरीत ४७ वृक्ष तोडले जाणार आहे. त्यानुसार पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु याठिकाणी वावळा आणि सोनमोहर ही ५० वर्षे जुनी मोठी वृक्ष आहेत. त्यामुळे ते हेरीटज वृक्ष म्हणून ओळखले जातात.
या वृक्षांचे काय करायचे असा पेच सध्या निर्माण झाला आहे. त्याचे पुर्नवसन करायचे किंवा दुस:या ठिकाणी ते हलवायचे या बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार पालिका या दोन वर्षाचा निर्णय राज्य शासनाकडून आलेल्या परवानगी नंतर घेणार आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर या वृक्षांचा निर्णय होणार आहे.