ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या 24 तासांत सोमवारी 476 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज 35 जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या नऊ हजार 513 झाली. तर आतापर्यंत रुग्ण संख्या पाच लाख 22 हजार 83 झाली आहे.ठाणे शहर परिसरात आज 82 रुग्णांची वाढ होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण एक लाख 310हजार 85 रुग्णांसह एक हजा 922 मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीला 134 रुग्णांची वाढ तर 21 मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्ण संख्या एक लाख 34 हजारो 75 झाली असून मृतांची संख्या आता दोन हजार 156 नोंदली आहे. उल्हासनरात 12 रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे. येथील मृतांची संख्या आता 478 झाली असून रुग्ण संख्या 20 हजार 424 नोंद झाली आहे. भिवंड शहरात पाच रुग्ण आढळले असता एकही मृत्यू झाला नाही. या शहरात 10 हजार 510 रुग्णांसह 445 मृतांची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरलाही 89 रुग्णांच्या वाढीसह आज तीन मृत्यू झाले. येथील रुग्णांची एकूण संख्या 49 हजार 486 झाली असून मृतांची संख्या एक हजार 294 नोंद झाली.अंबरनाथ शहरात 15 रुग्ण वाढल्याने येथील रूग्ण संख्या आता 19 हजार 422 झाली. तर 41 मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला 13 रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. एकूण 20 हजार 434 रुग्ण संख्या झाली असून 254 मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच ग्रामीण भागात 60 रुग्ण आढळले असून चार मृत्यू झाले आहेत. आता जिल्ह्यातील या गांवपाड्यात 37 हजार 535 रुग्णांसह 914 मृतांची नोंद करण्यात आली.
ठाणे जिल्ह्यात 476 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 35 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 10:27 PM
ठाणे शहरात 82 नव्या रुग्णांची वाढ
ठळक मुद्देठाणे शहरात 82 नव्या रुग्णांची वाढ