पालघर : जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, आणि कोकण विकास कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील गंभीर रु ग्णांची रक्ताच्या कमतरतेमुळे होणारी परवड दूर करण्याच्या हेतूने अध्यक्ष निलेश सांबरे ह्यांच्या प्रयत्नाने घेण्यात आलेल्या या शिबिराच्या माध्यमातून ४ हजार ७८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती दिना निमित्ताने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व कोकण विकास कामगार संघटना ह्यांच्या विद्यमाने पालघर व ठाणे जिह्यातील १६ गावात हे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्हा निर्मितीला तीन वर्षांचा कालावधी उलटून गेल्या नंतर ही सर्वसामान्यांना आजही योग्य आरोग्य सुविधांचा लाभ मिळत नसल्याने अनेक रु ग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागत असल्याचे दिसून येत आहे. अनेक रु ग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असल्यास त्यांना पालघर, डहाणू, वसई, वापी आदी ठिकाणच्या रक्तपेढी मध्ये धाव घ्यावी लागते. तेथे ही पैसे मोजल्याशिवाय रक्त दिले जात नसल्याने अनेक गरीब रु ग्णांना हा आर्थिक भार सोसावा लागत होता. त्यामुळे जिल्ह्यात रक्ताअभावी होणारे सर्वसामान्यांचे हाल थांबविण्यासाठी जिजाऊ संस्थेचे सांबरे ह्यांनी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.मोखाड्यात २१० दात्यांचा सहभाग; मोफत वितरणमोखाडा : राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मोखाडा येथे जिजाऊ संस्था झडपोली व कोकण विकास मंचाच्यावतीने रक्तदान शिबीरामध्ये २१० दात्यांनी रक्तदान केले. रक्ताचे वितरण मुंबई मधील अद्यावत अश्या रक्तपेढ्या कडे करण्यात येणार असून जिल्ह्यातील गरजू रक्तदात्याना रक्ताची गरज भासल्यास ते विनामूल्य पुरविण्याचे काम करण्यात येणार आहे.कुडूस येथील रक्तदान शिबिराला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादवाडा : कुडूस येथील पष्टे कॉम्प्लेक्स प्रांगणात जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महारक्त दान शिबीराचे आयोजन केले होते. याला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी कुडूस ग्रामपंचायतीच्या सरपंच छबीताई तुंबडे व माजी उपसरपंच ईरफानभाई सुसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मेमन,रामदास जाधव, गिरीश चौधरी, दामोदर डोंगरे व अनंता पाटील हे उपस्थित होते. या शिबीरातून १५० वर रक्तदात्यांनी रक्तदान केले.जव्हार, मोखाड्यातही चांगला प्रतिसादजव्हार/कासा : जव्हारमध्ये झालेल्या रक्तदान शिबीरामध्ये ५५ जणांनी तर कासा येथे झालेल्या शिबीरामध्ये ८८ दात्यांनी रक्तदान केले. यात महिलांचा मोठा सहभाग होता. यावेळी जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकात पटेल, विक्रमगडचे उपनगराध्यक्ष निलेश पडवळे तर कासा येथे तरुणांचा सहभाग होता.ृअनेक दिग्गजांची उपस्थितीपालघर मधील झडपोली, मनोर, वाडा, कुडूस, जव्हार, तलासरी, कासा, मोखाडा, खिनवली, उधवा तर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, डोलखांब, किनवली, शहापूर, पडघा, अंबाडी अश्याया सोळा ठिकाणी हे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ह्या शिबिराला आमदार संजय केळकर,आ. पांडुरंग बरोरा, विक्र मगडचे नगराध्यक्ष रवींद्र खुताडे, उपनगराध्यक्ष निलेश पडवळे, मोखाडा सभापती प्रदीप वाघ, जिप,प.स.सदस्य, ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. ह्या शिबिरा द्वारे जमा केलेल्या
पालघर व ठाणे जिल्ह्यातील १६ गावांमध्ये महारक्तदान शिबिरात ४,७८६ दात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 4:40 AM