कर्जत : आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या २१ तारखेला भारतासह जगभरात साजरा करण्यात येणार आहे. सरकारने शाळांमध्ये योग दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाने तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी पतंजली योग समिती कर्जतच्या सहकार्याने शिक्षकांना योग शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात ४८८ शिक्षकांनी उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. यामध्ये २८१ जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांचा सहभाग होता. महिला शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. कर्जत पतंजली योग समितीचे अध्यक्ष दिनेश रणदिवे व सचिव सुमेश शेट्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर रायगड पतंजली योग समितीचे दिलीप घाटे, रवींद्र पाटील, चैतन्य खंडागळे आणि राकेश शहा यांनी योगाबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग मेंगाळ, अशोक खडे यांनीही प्रात्यक्षिके करून दाखवली. सकाळी सात वाजता सुरु झालेले शिबिर साडेआठ वाजता संपले. या प्रशिक्षणाला ४८८ शिक्षकांनी उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘या योग शिबिराचा उपयोग विद्यार्थ्यांबरोबरच आम्हालाही होणार आहे’, अशी प्रतिक्रि या बहुतांश शिक्षकांनी बोलून दाखवली. (वार्ताहर)
कर्जतमध्ये ४८८ शिक्षकांनी घेतले योग प्रशिक्षण
By admin | Published: June 19, 2015 12:31 AM