शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

४९४ कर्मचा-यांना किमान वेतन, २७ गावांतील कर्मचा-यांनी केला जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:58 AM

केडीएमसीतील २७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ४९४ कर्मचाºयांना त्याचा लाभ होणार आहे

कल्याण : केडीएमसीतील २७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ४९४ कर्मचा-यांना त्याचा लाभ होणार आहे. किमान वेतनाचा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती मिळताच या कर्मचा-यांनी महापालिका मुख्यालयाच्या आवारात एकच जल्लोष करत आयुक्त पी. वेलरासू यांचे आभार मानले. या वेळी ‘आयुक्त झिंदाबाद’च्या घोषणाही देण्यात आल्या.१ जून २०१५ ला २७ गावे केडीएमसीत पुन्हा समाविष्ट झाली. तेथील कर्मचा-यांनाही प्रथमत: सहा महिन्यांसाठी महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्यात आले. त्यानंतर, वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली. परंतु, कायद्यानुसार त्यांना किमान वेतन मिळावे, अशी मागणी तेथील लोकप्रतिनिधींकडून वारंवार होत होती. यासंदर्भात कल्याण ग्रामीणचे शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनीही नुकतीच आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेत किमान वेतनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हा आयुक्तांनी २७ गावांतील ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाºया आणि आता महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांना सरकारी निर्णयानुसार लागू असणारे किमान वेतन लागू होणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंगळवारी होणाºया महासभेत प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला. ४९४ कर्मचाºयांपैकी चार जण हे अधिनियमात नमूद केलेल्या किमान वेतनापेक्षा जास्त वेतन असलेले आहेत. तर, एका कर्मचा-याचे निधन झाले आहे.कर्मचा-यांची प्रभागनिहाय आकडेवारी पाहता ‘आय’ प्रभाग क्षेत्रात २२७, तर ‘ई’ प्रभागात २६७ कर्मचारी आहेत. यात १५९ कुशल, अर्धकुशल १२ तसेच ३२३ कर्मचारी हे अकुशल आहेत. २७ गावांमध्ये ग्रामपंचायतींची संख्या २६ इतकी होती. परंतु, गावांची संख्या २७ आहे. भोपर व देसलेपाडा या गावांची एकच ग्रामपंचायत होती. ज्या कर्मचाºयांना किमान वेतन देय आहे, त्यांना ३ हजार ८० इतका विशेष भत्ता लागू आहे. दरम्यान, महापालिकेच्या तिजोरीवर महिन्याला ७६ लाख १८ हजार २०, तर वर्षाला ९ कोटी १४ लाख १६ हजार २४० रुपयांचा बोजा पडणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका