शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

सूर्याचे ५ दरवाजे उघडले, मोडकसागर ओव्हरफ्लो

By admin | Published: July 16, 2017 2:20 AM

मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे/कासा : मोडक सागर धरण शनिवारी पहाटे साडे सहा वाजता ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाखालील वाडा व पालघर तालुक्यातील ४२ गावांना मुंबई महानगरपालिकेने धोक्याचा इशारा दिला आहे. तर बुधवार पासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शनिवारी सायंकाळी साडेसहानंतर सुर्या धरणाचेही सर्व पाच दरवाजे उघडले आहेत.शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालीत पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.काही दिवस पावसाने दडी मारली असताना ठाणे, पालघर आणि मुंबईसह राज्यावर पाण्याचे संकट ओढवले होते. मात्र, बुधवारी रात्रीपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील धरणे झपाट्याने भरू लागली आहेत. यापैकी शहापूर तालुक्यात खर्डी गावाजवळील मोडकसागर या धरणाच्या पातळीत या पावसामुळे मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही तासांतच या धरणामधील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. पुढील २४ तास पाऊस असाच बरसत राहिला, तर धरणामधील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. हा परिसरातील गावांना धोक्याचा इशारा ठरू शकतो. याकरिता, येथील सहायक जलअभियंत्यांनी या धरणाच्या टप्प्याखाली येणाऱ्या ४२ गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. या यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामध्ये दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त, आपत्कालीन विभाग, भिवंडी, शहापूर, वाडा, पालघरचे तहसीलदार आदींचा समावेश आहे. तर, या धरण आणि नद्यांच्या टप्प्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गावांमध्ये दाधारे, जोशीपाडा, शेले, तिलसे पिंप्रोली, धीनदेपाडा, गाले, अनशेत, तुरी, सारसी, गंधारे, कोयना वसाहत, गेट्स बुद्रुक, शील, गेट्स खुर्द, अब्जे, आलमान, कुतल, बोरांदे, आवंधे, नाने, गलतरे, हमरापूर, सावरे, पाचूधारा, इंबुर, खडकीपाडा, मनोर, उधारापाडा, बहलोली, बोट, दहिसर मनोर, देवानीपाडा, खामलोली, विश्रामपूर, साखरे, ललटने, उंचवली, कोरीचापाडा, कोनपाडा आणि नवघर या गावांचा समावेश आहे. ही सर्व गावे वाडा आणि पालघर तालुक्यांतील आहेत. या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी ५३५.२६ फूट टीएचडीएवढी आहे. त्यामुळे हे धरण केव्हाही पूर्ण भरून वाहू शकते. त्यामुळे या गावांना हा इशारा देण्यात आला आहे.४२३७ क्यूसेक्स विसर्गकासा : दोन दिवसापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सूर्या धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून ४ हजार २३७ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला आहे. पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातल्या शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण (धामणी) सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे ७६ टक्के भरले असून पाणी नियंत्रणासाठी शनिवारी संध्याकाळपासून धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. पेठ, म्हसाड येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणची वाहतूकही खोळंबून राहिली आहे. रात्री उशिरापर्यंत कोणत्याही दुर्घटनेचे वृत्त हाती आलेले नव्हते.