ठाणे :
अवघ्या दोन दिवसापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी येत्या १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे १२ वाजविणार असा इशारा दिला होता. त्यानंतर आता हीच तारीख बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची निश्चित झाली असून लोकमान्य नगर भागात हा प्रवेशाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. परंतु आपण राष्ट्रवादी का सोडतो आहे, कशासाठी दुस:या पक्षात जात आहोत, याची भावनिक साद राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी येथील जनतेला घातली आहे. त्यांनी देखील आपली बाजू समजून घ्यावी असे त्यांनी येथील घराघरात धाडलेल्या पत्रत नमुद केले आहे. त्यानुसार आता १२ तारखेला राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत. आज जगदाळे पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर करणार आहेत.ठाण्यात राष्ट्रवादीची मोडतोड करण्याची व्युव्हरचना बाळासाहेबांची सिवसेना पक्षाने आखली आहे. त्यानुसार आता पहिल्या टप्यात राष्ट्रवादीचे चार माजी नगरसेवक यामध्ये हणमंत जगदाळे, सुधाबाई जाधवर, दिंगबर ठाकुर, वनिता घोंगरे आदींसह परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, माजी नगरसेवक संभाजी पंडीत, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आदींसह इतर पदाधिका:यांचा त्यात समावेश आहे. तसेच याच पटय़ातील दिवंगत माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा या देखील बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रंनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीला लोकमान्य नगर पटय़ात मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.जगदाळे यांनी मतदारांना घातली भावनिक साद हणमंत जगदाळे राष्ट्रवादी सोडणार हे निश्चित मानले जात होते. मात्र प्रवेशाची तारीख निश्चित नव्हती. आता मात्र येत्या १२ फेब्रुवारी रोजी हा प्रवेश निश्चित झाला असून आपण हा प्रवेश का करीत आहोत, यासाठी त्यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. यात ४० ते ४५ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत सामाजिक जीवनात काम करीत असतांना, सुरवातीला कॉंग्रेस आणि त्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत काम केले आहे. परंतु ही वाटचाल करीत असतांना माझी वैचारीक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्याची माहिती श्रेष्ठींकडे देखील दिली आहे. त्यानुसार तुमचा स्वाभीमानी सेवक कोणापुढे झुकणार नाही, हे देखील त्यांनी सांगितले होते. संयम पाळला, मात्र आता संयमाचा बांध फुटला आहे. मी जग जिंकले नाही, मात्र जनमत मिळविले आहे. त्याच जनमाताच्या खातर लोकमान्य, शास्त्री नगर भागाचा विकास करण्यासाठी या शिंदे यांच्या प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही पक्ष सोडत असतांना मी कोणाला दोष देणार नसल्याचे त्यांनी यात नमुद केले आहे.