शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Mumbra Hospital Fire: दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ठामपानेही 5 लाखांचे अर्थसाह्य करावे- शानू पठाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:40 PM

Prime Hospital Fire: फायर ऑडिट संदर्भात शानू पठाण यांनी सांगितले की, फायर ऑडीटबाबत मुंब्रा- कौसामधील रुग्णालयांनी ठामपाकडे अर्ज केल्यानंतरही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे रुग्णालयांचे व्यवस्थापन मनमानी करीत आहेत.

ठाणे : गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दुर्घटना घडल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ठाणे महानगर पालिकेनेही या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी ठामपाचे विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे. 

शानू पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की,  प्राईम हॉस्पीटलला आग लागल्यानंतर रुग्णांना बिलाल, कालसेकर आणि बुर्‍हाणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चौघांचा मृत्यू झाला आहे.  गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मिळवून देण्याचे जाहीर केले आहे. आमची मागणी आहे की, ठाणे महानगर पालिकेनेही मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांचे अर्थसाह्य करावे. ठामपा अधिकारी आणि पोलिसांची संयुक्त समिती या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. 

फायर ऑडिट संदर्भात शानू पठाण यांनी सांगितले की, फायर ऑडीटबाबत मुंब्रा- कौसामधील रुग्णालयांनी ठामपाकडे अर्ज केल्यानंतरही त्यांना योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे रुग्णालयांचे व्यवस्थापन मनमानी करीत आहेत. जर, वेळीच या रुग्णालयांना ठामपाकडून साह्य झाले असते तर त्यांनी नक्कीच फायर सिस्टीम कार्यान्वीत केली असती. त्यातून पालिकेचे उत्पन्नही वाढले असते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :mumbraमुंब्राcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलfireआग