मीरा रोड : जागेवर कोणतीही इमारत बांधकामाची परवानगी नसताना एका ग्राहकाकडून सदनिकेसाठी २० लाख उकळून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर, इस्टेट एजंट अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एका इस्टेट एजंटचा शोध सुरू आहे.मीरा रोडचे निवासी असलेले चरणजितसिंग अमरजितसिंग धंजल यांनी सदनिकाखरेदीसाठी सतीश पुनमिया ऊर्फ पिंटोभाई आणि प्रेम पांचाळ या दोघा इस्टेट एजंटशी २०१३ मध्ये संपर्क साधला होता. त्यावेळी या एजंटने अभय भंडारी याची बिल्डर म्हणून ओळख करून दिलीहोती.भंडारीने धंजल यांना ही जागा आपल्या मालकीची असून महापालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव टाकलेला आहे. तो मंजूर होताच इमारतीचे काम सुरू होईल व २०१५ पर्यंत सदनिकेचा ताबा मिळेल, असे आश्वासन दिले. त्यावेळी ५ हजार चौरस फुटांचा दर असून बुकिंगच्यावेळी ५० टक्के रक्कम देत असाल, तर ४ हजार रुपये चौरस फुटाच्या दराने सदनिका देऊ, असे भंडारी याने म्हटल्याने धंजल यांनीदेखील २० लाख दिले. भंडारी यांनी पैसे मिळाल्याची पावतीदिली.परंतु, सदनिका खरेदीविक्रीचा करारनामा मात्र करून देण्यात आला नाही. वर्षभर सातत्याने धंजल यांनी इमारत होणार, त्या ठिकाणी चकरा मारल्या. पण, इमारतीचे कामच सुरू झाले नव्हते. त्यांनी भंडारी याला विचारणा केली असता जमिनीचा वाद निर्माण झाल्याचे कारण पुढे करत टोलवाटोलवी सुरू केली.भंडारी याने धंजल यांना आधी बदलापूरला काम सुरू आहे, तेथे सदनिका देतो असेसांगितले. नंतर, तो विरार किंवा बोरिवलीला सदनिका देण्याचे आश्वासन देऊ लागला. पण, भंडारी व अन्य सहकाºयांनी मिळून आपली फसवणूक केल्याचे धंजल यांच्या लक्षात आल्याने त्याने पैसे परत देण्याची मागणी केली.भंडारी याने धंजल यांना २० लाख बुकिंगचे व दोन लाख अन्य आकारलेले शुल्क असे मिळून २२ लाख देण्याचे कबूल केले. धंजल यांना पुढील तारखांचे धनादेशसुद्धा दिले.परंतु, मी सांगेन तेव्हा धनादेश टाका, असे भंडारीने सांगितले. भंडारीचा काही फोन आला नाही आणि धंजल यांनीही पाठपुरावा करूनही त्यांना दाद मिळाली नाही.
फसवणूकप्रकरणी ५ जणांना अटक, सदनिकेसाठी उकळले २० लाख ; मीरा रोडची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 2:02 AM