शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पाच टक्के दरवाढीने तिळगुळावर महागाईची संक्रांत, राजस्थानचा गजक बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:37 AM

संक्रांतीचा गोडवा वाढवणा-या तिळगुळावर यंदा महागाईची संक्रांत आली आहे. तिळगुळाच्या लाडवांच्या दरात पाच टक्के तर हलव्याच्या दागिन्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना चावता येतील, असे नरम लाडू बाजारात उपलब्ध झाल्याने खलबत्त्यात लाडू फोडण्याची कसरत त्यांना यावर्षी करावी लागणार नाही.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : संक्रांतीचा गोडवा वाढवणा-या तिळगुळावर यंदा महागाईची संक्रांत आली आहे. तिळगुळाच्या लाडवांच्या दरात पाच टक्के तर हलव्याच्या दागिन्यांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना चावता येतील, असे नरम लाडू बाजारात उपलब्ध झाल्याने खलबत्त्यात लाडू फोडण्याची कसरत त्यांना यावर्षी करावी लागणार नाही.जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. तो येत्या रविवारी आहे. ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत परस्परांना तिळगुळाचे लाडू व फुटाणे, यांची देवाण घेवाण केली जाते. त्याचबरोबर गुळाची पोळी, तिळाची पोळी, काटेरी हलवा, तिळाचा हलवा, तिळाची चिक्की हे पदार्थ उपहारगृहांत, तसेच दुकानांत विक्रीसाठी सज्ज झाले आहेत. यंदा संक्रांतीनिमित्त राजस्थानमध्ये नावाजलेला ‘गजक’ हा तिळापासून बनवलेला पदार्थ उपलब्ध असल्याचे उपहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गजक हा खाद्यपदार्थ अंडाकृती असून तो ४०० रुपये किलो दराने मिळत आहे. यंदा तिळाचे दर स्थिर असले तरी गुळाच्या दरात मात्र चांगलीच वाढ झाल्याने गेल्या वर्षी ३२० रुपये किलो दराने मिळणारा तिळगुळ यंदा ३४० रुपये किलो दराने मिळत आहे.संक्रांतीचे लाडू खाण्याची इच्छा आहे पण दात काढले आहेत किंवा दातांवर कॅप बसवली आहे त्यामुळे खाता येत नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नागरिक करतात. काही ज्येष्ठ नागरिक कडक लाडू घरी घेऊन जातात व खलबत्त्यात फोडून मग लाडू खातात. यामुळे त्यांची लाडू खाण्याची मजा कमी होते शिवाय बोट खलबत्त्यात सापडून दुखापत होण्याची भीती असते. त्यामुळे ज्येष्ठांसाठी खास नरम लाडू तयार करण्यात आले आहेत. नरम गुळ वापरुन तयार केलेल्या लाडवाचे आणि कडक लाडवाचे दर सारखेच आहेत. गेल्या चार दिवसांपासून तिळगुळ बनवण्यास सुरूवात झाली आहे, असे जोशी यांनी सांगितले. गुळपोळी आणि तिळपोळी ६० रुपये दोन नग तर तिळाची पोळी ३४० रुपये किलो दराने मिळत आहे. फुटाण्यांमध्ये काटेरी हलवा, तिळाचा हलवा हे प्रकार असून २०० रुपये किलो दराने ते मिळत आहेत. यंदा हलव्याचे दर वाढलेले नसून ते स्थिर आहेत.हलव्याच्या दागिन्यांचे दर वाढले : संक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांनाही महत्त्व असते. त्यात मुकुट, बासरी, बांगड्या, बाजूबंद, हार बनवले जातात. हलव्याचे दागिने घालून लहान मुले, सुना अथवा जावई यांचा ‘तिळसण’ साजरा करण्याची पद्धत आहे. हे दागिने तयार करणाºयांची मजुरी वाढल्याने ते ३० रुपयांनी वाढले आहेत. गेल्यावर्षी १७० रुपयांपासून दागिन्यांचे दर होते. यंदा दर २०० ते ४०० रुपये आहे. परदेशात तिळगुळ पाठविण्यासाठी खरेदी सुरू झाली आहे. लाडू आणि गुळपोळ््या जास्त खरेदी केल्या जात आहेत. स्थानिक खरेदी ही शेवटच्या दिवसांत होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे