मीरारोड - अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ६३ वर्षीय वृद्धास ठाणे न्यायालयाने ५ वर्षांची सक्तमजुरी व ५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१९ साली अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्या प्रकरणी गुरुदास जयराम घोलकर ह्या ६३ वर्षीय आरोपीला पोक्सो व विनयभंग प्रकरणी अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बागल व उपनिरीक्षक चित्रा मढवी यांनी केला होता. पोलिसांनी सबळ पुरावे गोळा केले होते. पैरवी हवालदार चव्हाण यांनी केली.
ठाणे सत्र न्यायालयात न्यायाधीश माहेश्वरी पटवारी यांनी आरोपी घोलकर ह्याला दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली.