शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

५० मुख्याध्यापकांची ठामपा शाळांत वानवा

By admin | Published: April 09, 2017 2:48 AM

एकीकडे २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात महापालिका शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे.

ठाणे : एकीकडे २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात महापालिका शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. परंतु, असे असले तरी आधी या शाळांमध्ये रिक्त असलेले मुख्याध्यापकपद तरी आधी भरा, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. महापालिका शाळेत मागील पाच वर्षांपासून सुमारे ५० मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत.महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. यंदाच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणे, ई-लर्निंग आदींसह विविध योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, असे असले तरी पाच वर्षांपासून महापालिका मुख्याध्यापकच नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य काहीसे अधांतरी आल्याचे दिसत आहे. यासंदर्भात काही शिक्षक संघटनांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर जुन्या शिक्षकांच्या हाती सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन काही शाळांमध्ये त्यांना मुख्याध्यापकपदाची सूत्रे देण्यात आली. परंतु, ती केवळ नावापुरतीच असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)त्यांच्यावर कारवाई कधी?महापालिका शाळांमध्ये आजघडीला सुमारे ३४ हजारांच्या आसपास विद्यार्थी आहेत. १२०० च्या आसपास शिक्षकवृंद त्यांना ज्ञान देण्याचे काम करत आहे. परंतु, अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याने त्याचा शिक्षणावर परिणाम होत आहे. आपल्यावर लक्ष ठेवण्यास कोणी नसल्याने काही ठिकाणी शिक्षकदेखील उशिराने शाळेत हजेरी लावत आहेत.महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या सुमारे २०, उर्दू २, हिंदी ४ आणि इंग्रजी माध्यमाच्या ६ शाळांमध्ये मुख्याध्यापकांची वानवा आहे.