शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

पारस कन्स्ट्रक्शन्सला ५० हजारांचा दंड

By admin | Published: May 26, 2017 12:14 AM

इमारतीचे बांधकाम करून खोल्या विकल्यावर त्यातील सदस्यांची गृहनिर्माण संस्था स्थापन न करणाऱ्या आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करणाऱ्या पारस

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : इमारतीचे बांधकाम करून खोल्या विकल्यावर त्यातील सदस्यांची गृहनिर्माण संस्था स्थापन न करणाऱ्या आणि इतर कायदेशीर बाबींची पूर्तता न करणाऱ्या पारस कन्स्ट्रक्शन्सला फटकारुन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ५० हजाराचा दंड ठोठावला आहे.मीरारोड येथील मेघालय को-आॅप हौसिंग सोसायटीचे बांधकाम पारस कन्स्ट्रक्शन्सने करून त्यातील खोल्या विकल्या. परंतु,इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच त्यांनी ग्राहकांना २००२-०३ मध्ये सदनिकांचा ताबा दिला. तसेच पैसे घेऊनही सदनिकाधारकांची गृहनिर्माण संस्था स्थापन न केल्याने सदनिकाधारकांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करून घेतली. संस्थेची स्थापना झाल्यावर भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड करून देण्याची मागणी अनेकदा तोंडी, पत्राद्वारे आणि वकिलामार्फत नोटीस पाठवूनही सदस्यांनी केली मात्र पारस कन्स्ट्रक्शन्सने ती पूर्ण केली नाही. त्यामुळे मेघालय हौसिंग सोसायटीने त्यांच्याविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. ती अ‍ॅड्रेस लेफ्ट या शेऱ्याने परत आल्याने जाहिररित्याही सुनावणीची नोटीस दिली. मात्र तरीही कन्स्ट्रक्शन्सने बाजू स्पष्ट केली नाही.कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता कंपनीने बांधकाम केलेल्या इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, ओसीसाठी सदनिकाधारकांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही कन्स्ट्रक्शनने केले नाही. कंपनीने भूखंडाचे कन्व्हेअन्स डीड संस्थेच्या नावे केले नाही. या मागण्यांसाठी मेघालय कोआॅप हौसिंग सोसायटीने वकिलामार्फत दिलेली नोटीसही परत आली. एकंदरीतच कंपनीने जबाबदारी पार न पाडता सदोष सेवा दिल्याचे मंचाने स्पष्ट केले.