शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

५०० कोटींची ‘हंडी’

By admin | Published: February 14, 2017 3:01 AM

नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा

ठाणे : नोटाबंदीचा महापालिका निवडणुकीवर गंभीर परिणाम दिसेल, ही अपेक्षा फोल ठरवत काही धनदांडग्या उमेदवारांनी अक्षरश: दौलतजादा सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटी खर्च होतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा ८ लाख रुपये ठेवली असली, तरी काही उमेदवारांनी खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एकदोन आर्थिकदृष्ट्या तगडे उमेदवार दिले आहेत. अन्य दोन उमेदवारांचा खर्च त्यांनीच उचलायचा आहे. या वेळी शिवसेना-भाजपा हे परस्परांच्या समोर लढत असल्याने लढाई तुंबळ होणार आहे. सत्ताधारी भाजपाने अन्य पक्षांतील मातब्बर उमेदवार आपल्या पक्षात आणून त्यांना रिंगणात उतरवले आहे. याखेरीज, काही ‘टॉवरबाज’ नेते-कम-बिल्डर या उमेदवारांच्या राजकीय कुंडलीत ‘मंगलप्रभात’ होण्याकरिता रसद पुरवत असल्याचे अन्य पक्षाच्या उमेदवारांकडून सांगितले जाते. नोटाबंदीमुळे या निवडणुकीत लक्ष्मीदर्शन कार्यक्रम तेजीत नसेल, असा होरा होता. त्यातच निवडणूक आयोग, आयकर विभाग यांचे उमेदवारांकडे बारीक लक्ष असल्याने पैशांची उधळपट्टी होणार नाही, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात काही तगडे उमेदवार जोशात आहेत. केवळ आठ लाखांत चार पॅनलमध्ये जाऊन प्रचार कसा करायचा, असा सवाल काही उमेदवारांनी केला. उमेदवारांचे गुळगुळीत कागदावरील कार्यअहवाल, वचननामे, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेले डिजिटल वचननामे हाच खर्च अंदाजे दोन ते तीन लाखांच्यावर गेल्याचे बोलले जाते. याशिवाय, प्रचारासाठी लागणारे साहित्य, कार्यकर्ते, वाहने, निवडणूक विभागाकडून विविध स्वरूपाच्या परवानग्या, झेंडे लावण्यासाठी दिली जाणारी रक्कम आदींचा खर्चही आता वाढला आहे. पूर्वी प्रचारासाठी असलेल्या कार्यकर्त्याला दिवसाला १०० रुपये, तसेच चहा, नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण असा खर्च केला जात होता. परंतु, आज एका दिवसाच्या प्रचारफेरीसाठीच काही ठिकाणी ५०० ते ७०० रुपये मोजले जात आहेत. याखेरीज, रात्रीच्या पार्ट्या तेजीत आहेत. विविध मंडळे, महिला बचत गट, तरुण मित्र मंडळ यांची निवडणूक काळात चंगळ असते. बरेच उमेदवार मंडळे व संस्थांना निवडणूक घोषित होण्यापूर्वी पैसे वाटून मोकळे झालेले असतात. प्रचार सभा, चौक सभा याकरिता माणसे आणण्याकरिता माणशी ४०० ते ५०० रुपये खर्च होत आहेत. काही उमेदवारांनी हायटेक प्रचारासाठी वॉर रूम तयार केली आहे, यासाठी काही लाखांच्यावर खर्च केला जात आहे. काही उमेदवारांनी खासगी संस्था नेमून आपल्या प्रभागात सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे खर्च कमालीचा वाढला आहे. सोसायट्या व झोपडपट्ट्या बांधून ठेवण्याकरिताची धडपड निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत सुरू राहणार आहे.ठाण्यातील बहुतांश उमेदवारांनी कागदोपत्री आठ लाख रुपयांच्या आत खर्च केल्याचे दाखवले असले, तरी प्रत्यक्षात किमान २५ लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत काहींचा खर्च झाला आहे. शेवटच्या तीन दिवसांत मतांची फिरवाफिरव करण्यासाठी लाखोंची उधळपट्टी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निवडणुकीत किमान ५०० कोटींची उधळण होणार, हे नक्की आहे. (प्रतिनिधी) उल्हासनगरमध्ये १५० कोटींचा चुराडा निवडणूक आयोगाने उमेदवारांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या खर्चाचे बंधन घातले असले, तरी चारसदस्यीय प्रभागपद्धतीत प्रत्येक पक्षाने एक पैशाने गब्बर उमेदवार देऊन त्याच्यावर अन्य उमेदवारांच्या खर्चाची जबाबदारी टाकल्याने यंदा निवडणुकीत किमान १५० कोटी रुपयांचा चुराडा होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. उमेदवारांनी सजवलेली त्यांची कार्यालये, तेथील झेंडे-बॅनर, कार्यकर्त्यांना चहा-नाश्त्याचा सुरू असलेला रतीब, प्रचारफेऱ्यांमध्ये जमवली जाणारी गर्दी, जेवणाच्या पंक्ती, रात्रीच्या खाणावळी आणि पार्ट्या हे सारे पाहता खर्चाचे बंधन आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवारांनी पाळण्याचा वसा असून रग्गड पैसेवाल्या उमेदवारांकडे पैसा धो-धो वाहत आहे.तिरंगी आणि चौरंगी लढत असल्याने प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उल्हासनगरमध्ये विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा विचार केला असता ४५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यातील ५० टक्के उमेदवार हे मध्यमवर्गीय आहेत. मात्र, उर्वरित ५० टक्के उमेदवारांपैकी ३० टक्के उमेदवार हे निवडणुकीत अमाप खर्च करीत आहेत. काही उमेदवार लाख ते दोन लाख रुपये खर्चदेखील मोजूनमापून करणारे आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग असल्याने पक्षाच्या श्रीमंत उमेदवाराला स्वत: निवडून येण्याबरोबर इतर उमेदवरांच्या खर्चाची जबाबदारी उचलण्यास सांगितले आहे. उल्हासनगर हे व्यापारी शहर असल्याने उमेदवार आर्थिकदृष्ट्या सक्षमच देण्यात आले आहेत. शिवसेना, भाजपा, टीम ओमी, साई पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारांची श्रीमंती पाहूनच त्यांना उमेदवारी दिली आहे. उल्हासनगरात काही वर्षांपर्यंत ‘पप्पूगिरी’च्या जीवावर ज्या निवडणुका जिंकल्या जात होत्या, त्याच उल्हासनगरमध्ये या निवडणुकीत ‘दादागिरी’पेक्षा (पप्पूगिरी हा या शब्दांचा समानार्थी शब्द आहे) आर्थिक उधळपट्टी करून निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती अवलंबली जात आहे. पॅनल क्रमांक-२ मध्ये ओमी कलानी यांची पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने या प्रभागात संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी सर्वाधिक खर्च केला जात असल्याची चर्चा आहे.झोपडपट्टीत मतांना पैसे आणि सोसायटीच्या विकासाची कामे करण्याची रणनीती उमेदवारांनी अवलंबली आहे. सोसायटीमधील रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे, पेव्हर ब्लॉक, बोअरवेल आणि सुशोभीकरण करून देण्याची कामे एकतर दोन महिन्यांपूर्वी केलेली आहेत किंवा विजयी झाल्यास करण्याबाबतची पत्रं उमेदवार देत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये उमेदवारांनी भोजनावळी घातल्या. हा सर्व खर्च उमेदवारांच्या वतीने केला जात असला तरी तो व त्यांचे निकटचे कार्यकर्ते कुठेही थेट समोर येत नाहीत.