कल्याण : कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या डोंबिवलीकर कुटुंबीयांच्या मदतीला शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे हे शाडू व कागदाच्या लगद्याच्या गणपतीच्या ५०० मूर्ती सेवा म्हणून नाममात्र १०१ रुपयांत देणार आहेत. यासाठी नजीकच्या शिवसेना शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या साथीमुळे झालेल्या कुलुपबंदीमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट आलं. ते कमी म्हणून नैसर्गिक आपत्तींनाही तोंड द्यावे लागत आहे. प्राप्त परिस्थितीत आपल्या हिंदुप्रथा, परंपरेप्रमाणे घरगुती गणेशोत्सव साजरा करावाच लागणार आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या डोंबिवलीकरांना गणेशोत्सवाचा आनंद प्राप्त व्हावा, या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. दीड ते चार रुपयांच्या या ५०० मूर्ती प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा, या तत्त्वाने दिल्या जाणार आहेत. ज्यांना लाभ घ्यायचा आहे, त्यांनी नजीकच्या शिवसेना शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.