- पंकज रोडेकर ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकातील वन रूपी क्लिनिकमध्ये बाजारभावापेक्षा अल्पदरात लवकरच रक्ततपासणी करणारी ‘पॅथॉलॉजी लॅब’ सुरू होत आहे. ५०० प्रकारच्या आजारांवरील रक्ताची येथे तपासणी होणार आहे. अशा प्रकारे रेल्वेस्थानकात देशात पहिली लॅब सुरू करण्याचा मान ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकाला मिळाला आहे. विशेष म्हणजे येथे रक्ताच्या तपासणीसाठी येणाऱ्यांनी जर रेल्वे प्रवासी तिकीट दाखवल्यास त्याला मिळणाºया सवलतीमध्ये आणखी १० टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती मॅजिक दिल हेल्थ व वन रूपी क्लिनिकच्या डॉक्टरांनी दिली.ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-२ येथे हे वन रूपी क्लिनिक सुरू आहे. या क्लिनिकमध्ये अल्पदरात विविध प्रकारच्या सध्या तपासण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात रक्ततपासणी होत आहे. त्यातच आता मॅजिक दिल हेल्थने ‘पॅथॉलॉजी लॅब’ सुरूकरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्चून अत्याधुनिक मशीन खरेदी केली आहे. या मशीनला विशिष्ट असे बार कोड असणार असून दिवसाला साधारणत: तीन ते चार हजार रक्ततपासणी क रता येणार आहे. साथीचे आजार असो, या मधुमेह यासारख्या आजारांपासून गंभीर असलेल्या कर्करोगासारख्या अशा एकूण ५०० आजारांच्या रक्ताची तपासणी केली जाणार आहे. तसेच देशात अद्यापही एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्पदरात रक्ततपासणी करून देणारी लॅब कोणत्याही रेल्वेस्थानकात सुरू नाही. ती ठाण्यात होणार असल्याचा दावा वन रूपी क्लिनिकच्या डॉक्टरांनी केला आहे.>रक्ततपासणीसाठी६० टक्के सवलतरेल्वे प्रवास करताना, तिकीट काढण्याची सवय नागरिकांना लागण्यासाठी, या क्लिनिकने विशेष सवलत दिली आहे. येथे रक्ततपासणीसाठी ६० टक्के सवलत असणार आहे. त्याचबरोबर तिकीट दाखवून आणखी १० टक्के सवलत मिळवता येणार आहे.>रेल्वे कर्मचाºयांची होणार तपासणीही लॅब ज्या दिवशी सुरू होणार आहे, त्या दिवसाच्या प्रीत्यर्थ ठाणे रेल्वेस्थानकातील तब्बल १५० रेल्वे कर्मचाºयांची आरोग्यतपासणी केली जाणार आहे. यामध्ये ईसीजी, बीपी याची तपासणी करण्यात येईल.>ंऐतिहासिक असलेल्या ठाण्यात ५०० प्रकारच्या आजारांची रक्ततपासणी करणारी रेल्वेस्थानकावरील पहिली लॅब ठरणार आहे. ती येत्या दोनतीन दिवसांत सुरू होईल. तसेच तपासणी करणाºया रुग्णाला दोन तासांत त्याचा अहवाल मिळेल.- डॉ. राहुल घुले,सीईओ, मॅजिक दिल हेल्थ>चोवीस तास एमबीबीएस डॉक्टरया क्लिनिकमध्ये डॉक्टर आहेत. त्याचबरोबर येथे २४ तास एमबीबीएस असलेले डॉक्टर नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.
रेल्वेस्थानकातील लॅबमध्ये ५०० आजारांच्या तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 2:26 AM