ठाणे : स्वाइन फ्ल्यूने तब्बल ५१ जणांचा बळी गेल्यानंतर आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. ‘बैल गेला आणि झोपा केला’, अशी ठाण्यातील शासकीय आरोग्य सेवेची दुरवस्था असल्याचे यामुळे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.पावसाळ््यात साथीचे आजार डोके वर काढतात. यंदा ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्ल्यूने कहर केला. त्यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नव्हती. वारंवार मागणी करुनही ती उपलब्ध केली गेली नाही. मात्र त्याचवेळी खासगी इस्पितळे ९०० ते १००० रुपयांना ही लस विकून नफेखोरी करीत होती.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे खासगी इस्पितळांशी साटेलोटे असल्यानेच त्यावेळी लस उपलब्ध न झाल्याचा आरोप सामाजिक संस्था व रुग्णांच्या नातलगांनी केला होता.आॅक्टोबर अखेरीस स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव झपाट्याने कमी झाला असून आता फारच तुरळक रुग्ण आढळून येत आहेत. अशावेळी आता प्रतिबंधात्मक लस ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. दरवर्षी स्वाइन फ्ल्यूचे विषाणू जसे नवनवे स्वरुप धारण करतात त्यानुसार त्याच्या प्रतिबंधात्मक लसीत बदल केले जातात. त्यामुळे आता घेतलेल्या लसीचा पुढील वर्षीच्या पावसाळ््यात किती लाभ होईल, याबद्दल साशंकता आहेच.‘लोकमत’ने स्वाइन फ्ल्यूची लस शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसल्याने होणाºया मृत्यूंचा विषय ऐरणीवर आणला होता. आॅगस्ट महिन्यात नोंदवलेल्या लसीचा आॅक्टोबर अखेर पुरवठा करणाºया कंपन्यांकडून दिरंगाई झाल्याचे जिल्हा प्रशासनाने मान्य केले.ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा जिल्हा असून सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच दोन नगर पंचायतींचा त्यामध्ये समावेश आहे.या कार्यक्षेत्रात १ जानेवारी ते २३ आॅक्टोबर दरम्यान स्वाइन फ्लू बाधीत ९८२ रुग्ण आढळून आले. त्या मधील ९३२ जण उपचार घेऊन घरी परतले. एकूण ५१ जणांचा जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.दोन लाख ७२८ जणांची तपासणीठाणे आणि नवी मुंबई या महापालिकाच्या क्षेत्रात प्रत्येकी एक स्वाइन फ्लू बाधीत रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. याच कालावधीत दोन लाख ७२८ जणांची तपासणी केली. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख ९ हजार १२२ व्यक्ती नवी मुंबईतील होत्या.त्यापाठोपाठ ठाणेकरांची तपासणी केली गेली. बाधीत रुग्ण आणि स्वाइन फ्ल्यूमुळे दगावणारे रुग्ण ठाण्यात जास्त आढळून आल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसते.ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने केलेल्या मागणीप्रमाणे प्रतिबंधात्मक लस आता उपलब्ध झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण आणि उप जिल्हा रुग्णालयाकडून ज्याप्रमाणे मागणी होईल. त्याप्रमाणे ती लस त्या रुग्णालयांना उपलब्ध करून दिली जाईल.- डॉ.बी.सी. केम्पीपाटील, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक
५१ शासकीय बळींनंतर स्वाइन लस उपलब्ध, साथ ओसरल्यावर आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 5:29 AM