ठाणे शहर परिसरात १३१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता १ लाख ३२ हजार ३४५ झाली आहे. शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार इतकी ९६४ इतकी आहे. कल्याण-डोंबिवलीत ८९ रुग्णांची वाढ झाली असून, एकाच्या मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत १३५ रुग्णांची वाढ झाली असून, सातजणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये १४ रुग्ण सापडले असून, दोन मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत पाच बाधित असून, एकाही मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ४८ रुग्ण आढळले असून, एका मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळले असून, तीन मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये २५ रुग्णांची नोंद असून, १३ मृत्यूंची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ६१ नवे रुग्ण वाढले असून, एका मृत्यूची नोंद आहे. आता बाधित रुग्णसंख्या ३८ हजार ३५६ झाली असून, आतापर्यंत ११६६ मृत्यूंची नोंद आहे.
जिल्ह्यात ५२२ नवे रुग्ण, तर २८ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:26 AM