लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ५२२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता पाच लाख २८ हजार १२६ इतकी जिल्हयात कोरोना रु ग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात २८ रु ग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या दहा हजार ५१७ झाली आहे.ठाणे शहर परिसरात १३१ रु ग्ण आढळल्याने येथील रु ग्ण संख्या आता एक लाख ३२ हजार ३४५ झाली आहे. शहरात सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ९६४ इतकी स्थिर राहिली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत ८९ रु ग्णांची वाढ झाली असून एकाच्या मृत्यूची नोंद आहे. नवी मुंबईत १३५ रुग्ण नव्याने वाढले असून सात जणांचा मृत्यु ओढवला आहे. उल्हासनगरमध्ये १४ रु ग्ण नव्याने आढळले असून दोघांच्या मृत्युची नोंद झाली. भिवंडीत अवघे पाच तर मीरा भार्इंदरमध्ये ४८ बाधितांची नोंद झाली. भिवंडी आणि मीरा भार्इंदरमध्ये सुदैवाने एकही मृत्यु झालेला नाही. अंबरनाथमध्ये १४ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये २५ रुग्णांची नव्याने नोंद झाली असून १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ६१ रुग्ण नव्याने आढळले तर एकाचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी बाधीतांची संख्या ३८ हजार ३५६ झाली असून एक हजार १६६ मृत्युची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात ५२२ नवे रु ग्ण; तर २८ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:40 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ५२२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शनिवारच्या तुलनेत ...
ठळक मुद्दे रविवारी पुन्हा रुग्णसंख्या वाढली