शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

सव्वापाच कोटींचा ‘टीएमटी’त घोटाळा, दोषी ठेकेदार मात्र मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 1:53 AM

ठाणे परिवहनसेवेचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसला, तरी येथे होणारे घोटाळे मात्र नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पाच कोटींच्या जाहिरात घोटाळ्यामुळे परिवहन सेवा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठाणे - ठाणे परिवहनसेवेचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसला, तरी येथे होणारे घोटाळे मात्र नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पाच कोटींच्या जाहिरात घोटाळ्यामुळे परिवहन सेवा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बसथांब्यांवरील जाहिरातींपोटी ठेकेदाराने सव्वाचार वर्षांत केवळ २१ लाख ७२ हजारांचा जाहिरात करभरणा महापालिकेच्या तिजोरीत केला आहे. ही रक्कम अपेक्षित कराच्या केवळ २.५ टक्के इतकी असून, या ठेकेदाराने परिवहनसेवेचे तब्बल सव्वापाच कोटी रुपये बुडवल्याचे निदर्शनास आले आहे. भरिस भर, या ठेकेदाराचा ठेका रद्द न करताच नव्या ठेकेदाराला बसथांब्यांवरील जाहिराती देण्यासाठी परिवहन प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.बसथांब्यांवरील जाहिरातींचा ठेका देण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० आॅगस्टच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहे. परिवहनसेवेमार्फत ४७० बसथांब्यांवर जाहिरात करण्याचे हक्क मे. सोल्युशन अ‍ॅडव्हर्टायझिंगला दिले होते. बीओटी तत्त्वावर हे बसथांबे बांधण्याबरोबरच कंपनीने टीएमटीला युरो थ्री कॅटेगरीमधील नऊ सेमी लोफ्लोअर बसेस विकत घेऊन देण्याची अट निविदेत होती. मात्र, सुरुवातीपासूनच हा ठेका वादाच्या भोवºयात सापडला आहे. बस आणि बसथांब्यांचा दर्जा, त्याठिकाणी अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा देण्यात ठेकेदार अपयशी ठरला. त्यामुळे परिवहन समिती, स्थायी समितीच्या बैठकीत तसेच महासभेत ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याची मागणी वारंवार झाली आहे. हा वाद थेट न्यायालयापर्यंत गेला होता. या ठेकेदारामार्फत टीएमटीच्या बसथांब्यांवर ज्या जाहिराती प्रदर्शित होतात, त्यापोटी जाहिरातकर पालिकेला अदा करण्याची अट मूळ निविदेत होती. मात्र, नियमानुसार करभरणा होत नसल्याची तक्रार आयुक्तांकडे आल्यानंतर जानेवारी आणि एप्रिल, २०१८ या दोन महिन्यांत पालिकेने बसथांब्यांवरील जाहिरातींचे सर्वेक्षण केले. त्यात एकूण ५५ बसथांब्यांवर जाहिराती प्रसिद्ध होत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, १० जून २०१३ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत जाहिरातकरापोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ २१ लाख ७२ हजार रु पयेच जमा झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर, या कंपनीच्या जाहिरातींची सखोल चौकशी केली असता ठेकेदाराने तब्बल पाच कोटी २० लाखांचा महसूल बुडवल्याचा साक्षात्कार परिवहनला झाला. करारानुसार या कंपनीकडे जाहिरात प्रदर्शनाचे आणखी सहा वर्षांचे अधिकार असतानाही करार रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत.ठेकेदाराने बुडवलेला महसूल जमा करण्यासाठी कारवाई करणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र, करारनामा अद्याप रद्द झालेला नसतानाही पालिकेने ४७० बसथांब्यांवरील जाहिरातींसाठी नव्याने ठेकेदार नेमण्याच्या हालचाली सुरू केल्यात. नवा ठेकेदार नेमल्यानंतर जुन्या ठेकेदाराने बुडवलेल्या सव्वा पाच कोटींचे काय, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाnewsबातम्या