शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

‘मिलीबग’मुळे ५५ रेन ट्री धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 11:47 PM

पूर्वेतील पेंढरकर कॉलेजसमोरील पाच ‘रेन ट्री’ना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. त्यामुळे ही झाडे सुकली आहेत. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसीकडे कोणतीही यंत्रणा नाही

डोंबिवली : पूर्वेतील पेंढरकर कॉलेजसमोरील पाच ‘रेन ट्री’ना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. त्यामुळे ही झाडे सुकली आहेत. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडीएमसीकडे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील जवळपास ५५ रेन ट्री जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत.पेंढरकर कॉलेज येथील पाच ‘रेन ट्री’ रसायन टाकून मारल्याचा संशय ‘डोंबिवली रेसिडेन्सिअल वेल्फेअर असोसिएशन’चे सचिव राजू नलावडे यांनी व्यक्तकेला होता. याप्रकरणी त्यांनी केडीएमसीचे ‘ई’ प्रभाग अधिकारी तसेच उद्यान विभागाकडे तक्रारकेली होती.यासंदर्भात महापालिकेतील उद्यान अधीक्षक संजय जाधव म्हणाले, पेंढरकर कॉलेजजवळील झाडांना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. ही कीड झाडातील सगळा रस शोषून घेते. त्यामुळे झाडे निष्पर्ण होतात. कल्याण-डोंबिवलीतील ५५ झाडांना ‘मिलीबग’ची लागण झाली आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका हद्दीतील हजारो ‘रेन ट्री’ना ‘मिली बग’ने ग्रासले आहे. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसारख्या यंत्रणेकडे कोणतीही उपाययोजना नाही, तर केडीएमसी त्याला काय पुरी पडणार, असे स्पष्टीकरण जाधव यांनी दिले.आपल्याकडील दमट वातावरण मिलीबग या किडीसाठी पोषक असल्याने ती ‘रेन ट्री’ची शिकार करतात. कल्याण-डोंबिवलीतील ५५ झाडे या ‘मिलीबग’ची शिकार झाली आहेत. पेंढरकर कॉलेजसमोरील पाच झाडे तसेच मनसे नगरसेवक मंदार हळबे यांच्या प्रभागातील दोन ‘रेन ट्री’ही पडले आहेत. तर, कल्याणच्या आधारवाडी कारागृहानजीकचे दोन ‘रेन ट्री’ही ‘मिली बग’च्या कचाट्यात सापडले आहेत.‘मिलीबग’ ही केसाळ कीड आहे. ती झाडाचा रस शोषून घेते. त्यामुळे झाडे निष्पर्ण होऊन सुकतात. काही प्रसंगी झाड बुंध्यात फुटते. या विविध शक्यता आहेत. ‘रेन ट्री’ हे झाड उंच असल्याने उंच झाडावर कीटकनाशक फवारणी कशी करणार, ही अडचण असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावर कोणताच उपाय नसल्याने महापालिकेने ‘मिलीबग’विषयी हतबलता दर्शवली आहे.दरम्यान, प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे प्रमुख निलेश भणगे यांनी सांगितले, ‘रेन ट्री ही झाडे ज्यांना नको आहेत, त्यांनी हा ‘मिलीबग’चा जावईशोध लावला आहे. त्यांना ही झाडे नष्ट करायची आहेत. त्यामुळे हा मिलीबग नसून मिलीभगत आहे, असा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात संघटना तक्रार करणार आहे.’पिठ्या ढेकूण अर्थात मिलीबगपिठ्या ढेकूण ही कीड मिलीबग किंवा पांढरा ढेकण्या या नावानेही ओळखली जाते. या किडीच्या निरनिराळ्या प्रजाती महाराष्ट्रात आहेत. उष्ण आणि कोरड्या हवामानात या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो.या किडीच्या शरीराला मऊ कापसासारखे आवरण असल्याने कीटकनाशक किडीपर्यंत पोहोचण्यास अडथळा येतो. त्यामुळे या किडीच्या बाल्यावस्थेतच जर कीटकनाशकांची फवारणी केली, तरच या किडीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. पिल्ले नारंगी रंगाची असतात.हे कीटक झाडांवरील फळांवर, देठांवर तसेच फळाच्या खालील पाकळीत कापसासारख्या आवरणाखाली पुंजक्याच्या स्वरूपात एका जागेवर राहून पेशीद्रव्ये शोषतात.