- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर कोरोना मुक्त व जलद लसीकरण होण्यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती व समाजसेवक शिवाजी रगडे यांच्याकडून महापालिका आरोग्य अधिकारी डॉ दीपक पगारे यांना ५ हजार ५०० सिरीज दिल्या आहेत. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याची विनंती यावेळी चक्रवर्ती यांनी केली.
उल्हासनगरची घोडदोड कोरोना मुक्तीकडे सुरू असून शहरात एकून ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. तर महापालिका कोविड रुग्णालयात फक्त ५ रुग्ण उपचार घेत आहेत. इतर रुग्ण होमकॉरोन्टीइन व शहरा बाहेरील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ दीपक पगारे यांनी दिली. शहर कोरोना मुक्त व जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती व समाजसेवक शिवाजी रगडे यांनी पुढाकार घेऊन आरोग्य विभागाला तब्बल ५ हजार ५०० सिरीज मोफत दिल्या. याप्रकारने सर्वस्तरातून कौतुक होत आहे. लसीकरणा बाबत महापालिका नवनवीन विक्रम करीत असून ५० टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी पहिला डोस घेतला. तर ३ लाखा पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ अनिता सपकाळे यांनी दिली.
शहरात जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी महापालिकेच्या विविध ६ आरोग्य केंद्रा मार्फत लसीकरण सुरू आहे. या व्यतिरिक्त नगरसेवक, सामाजिक संस्था व समाजसेवक यांच्या मागणीनुसार लसीकरण शिबिराचे आयोजन महापालिका आरोग्य विभागा मार्फत सुरू आहेत. तसेच नागरिकांच्या घरी लसीकरण करण्यासाठी फिरते लसीकरण केंद्र सुरू केल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. तसेच लसीकरणा बाबत महापालिका राज्यातील इतर महापालिके पेक्षा पुढे असल्याची माहितीही उपायुक्त जाधव यांनी दिली.