ठाणे : अत्याधुनिक शेतीच्या अभ्यासासाठी ठाणे जिल्ह्यातील ५६ शेतकºयांसह ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे (टीडीसीसी) १९ संचालक आणि दोन अधिकारी यांना इस्रायलच्या अभ्यास दौºयावर जाण्याची संधी मिळणार आहे. बँकेतर्फे यासाठी सुमारे ८९ लाखांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील आणि उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कमी पावसाच्या पाण्यात अत्याधुनिक प्रकारे शेती कशी केली जावी तसेच ठिबक सिंचन, वराहपालन अशा अनेक बाबींचा अभ्यास याठिकाणी शेतकºयांना करता येणार आहे. त्याचा लाभ टीडीसीसी बँकेच्या कर्जदार शेतकºयांना तसेच शेतकरी म्हणून शेती संस्थांमधून निवडून आलेल्या ५८ शेतकºयांना मिळणार आहे. या पत्रकार परिषदेस माजी अध्यक्ष बाबाजी पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर उपस्थित होते. यासाठी संचालक मंडळाच्या निर्णयानंतर राज्याच्या सहकार आयुक्तांनीही परवानगी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. फेब्रुवारी २०१९ च्या दुसºया आठवड्यामध्ये हा दौरा होणार आहे. दौºयासाठी एक कोटी ५६ लाखांची बँकेने तरतूद केली आहे. त्यातील प्रत्येकी एक लाख १० हजार असा सुमारे ८९ लाखांचा हा खर्च अपेक्षित आहे. डहाणूतील चिकूचे पीक घेणारे, माहीम, वसई तसेच जिल्ह्यातील इतर शेतकºयांना याचा लाभ होणार आहे. बँकेच्या १९ संचालकांनाही सहकार प्रशिक्षण मिळणार आहे.ई-पासबुक प्रणालीचे उदघाटनयंदापासून प्रथमच बँकेच्या ग्राहकांना ई-पासबुकसाठी विशेष अॅपची निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटनही यावेळी अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. खातेदाराला काही कारणास्तव आपले खाते तात्पुरते बंद करायचे असल्यास तशीही सुविधा या अॅपद्वारे पुरवली आहे. याशिवाय, अनेक स्टेटमेंटसह अनेक सुविधा यात असल्याचे ते म्हणाले.सचिवांचे पगार टीडीसीसी करणारठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत ४०२ शेती संस्था असून त्यामध्ये ११० सेवा संस्था आहेत. त्यातील ११० सचिवांच्या दोन कोटी ५६ लाख ५६ हजारांच्या वेतनाचा वार्षिक भारही बँकेतर्फे उचलला जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात ६८.६६ कोटी कर्जाचे वितरणजिल्हा मध्यवर्ती बँकेकडून २०१८-२०१९ या खरीप हंगामात ठाणे जिल्ह्यात ६८.६६ कोटी, तर पालघर जिल्ह्यात ६१.०७ कोटी असे १२९.७३ कोटींचे पीक कर्ज शेतकºयांना वाटप केल्याचेही ते म्हणाले.