विक्रमगड : तीन वर्षापुर्वी बांधलेल्या विक्रमगड ओव्हळावरील पुलाकरीता ५६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे़ मात्र, या पुलाची दयनीय अवस्था झालेली असून बांधकामातील खडी, लोखंडी गज बाहेर आल्याने प्रवास धोक्याचा बनला आहे. उभारणी करताना अनेक त्रुटी राहील्याने या रस्त्यामध्ये तीन मेनलाईच्या विदयुत खांबाचा अडथळा आहे तसेच एकाबाजुस मोहाचे झाड देखील अडथळा ठरत आहे.रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे पडून त्यामधील खडी व कमी दर्जाचे वापरण्यांत आलेले स्टील (लोखंडी गज) बाहेर आल्याने पादचाऱ्यांना त्रासा बरोबरच तो धोक्याचा बनला आहे. अनेकदा येथुन जाणारे वाहनांचे टायर पंचर होत आहेत. मात्र याकडे साबा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे़ त्यातच २९ एप्रिलला निवडणुक असल्याने शासकीय यंत्रणांना त्याकडे पहायला वेळ नाही. दरम्यानच्या काळात या पुलाचे काम २०१५ च्या पावसाळयाच्या अगोदर सुरू करण्यांत आले़ व काम पुर्ण होतांना डांबरीकरण व सरंक्षण कठडयाचे काम शिल्लक असतांना पाऊस सुरु झाल्याने आल्याने ते काम तसेच ठेवण्यात आले़ त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर सहा महिन्यांनी डांबरीकरण करण्यात आले़ या पुुलास पुलास ५६ लाखांची मंजुरी असतांना त्यापेक्षा अधिक खर्च करावा लागला आहे़ हे विशेष.तीन वर्षांतच दुरवस्थाडहाणू रस्त्यावरील ओव्हळाची (पुलाची) उंची अतिशय कमी असल्याने तो पावसाळयात पुर्णपणे पाण्याखाली जाऊन वाहतुक विस्कळीत होते.त्यामुळे शासनाने या पुलास मंजुरी दिली होती. पुलाचे काम पुर्ण झाले मात्र तीन वर्षातच त्याची दुरावस्था झाली आहे.
सा.बां.चे ५६ लाख पाण्यात; विक्रमगड-ओव्हळावरील पुलाची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:55 PM