शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

भिवंडीतून विदेशी मद्यासह ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Published: January 22, 2023 7:20 PM

राज्य उत्पादन शुल्कच्या धाडीत बनावट मद्याचे गोदाम सील, मद्य वाहतूकीची बीएमडब्ल्यूही जप्त

ठाणे - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने भिवंडी आणि कल्याण या तालुक्यांमध्य दमण व हरियाणा राज्यांमधील निर्मित तसेच महाराष्ट्रातील बनावट विदेशी मद्य व बिअर साठयाचे गोदामांवर कारवाई करुन ते सीलबंद केले. अलिशान मोटार आणि मद्यासह ५६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून संदीप दावानी (३४, रा. उल्हासनगर) आणि हनुमंत ठाणगे(६२) या दोघांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दिली.

बीएमडब्ल्यू कारचा मालक दीपक जयसिंघानी हा पसार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. जुन्या कपड्याच्या गोण्यांमध्ये लपवून हा मद्याचा साठा महाराष्ट्र राज्यात आणण्याचे तपासात उघड झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, ठाणे जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे तसेच कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे निरीक्षक संजय भोसले, ठाणे भरारी पथकाचे निरीक्षक नंदकिशोर मोरे, अनिल पवार, राजेंद्र शिरसाठ, संजय गायकवाड तसेच दुय्यम निरीक्षक पूजा रेखे आदींच्या पथकाने २२ जानेवारी रोजी ही कारवाई केली.

भिवंडी तालुक्यातील कल्याण पडघा रोडवरील बापगाव येथील गाळा क्रमांक पाच येथील गोदामात मद्याची साठा केल्याची माहिती ठाणे उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे या पथकाने पाच ठिकाणी साठा केलेल्या बनावट मद्याच्या साठ्यांचे २६६ बॉक्स जप्त केले. यावेळी संदीप आणि हनुमंत या दोघांना अटक केली. सखोल चौकशीमध्ये या पथकाला कल्याण मुरबाड रोडवर व्हरटेक्स स्कायव्हिला या इमारतीच्या १००३ या पार्र्किं गमध्ये विदेशी मद्य भरलेली मोटारकार उभी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकून कारमधील २५ बॉक्स सह २९९ बॉक्स व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी त्रिकुटाविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.

पसार झालेल्या दिपक याच्या नावाने ही बीएमडब्ल्यू कार असून त्यांच्या नावावर मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांमध्ये हे वाईन शॉप आहे. त्या कारमधून २५ मॅकडोवेल दमण निर्मित मद्याचे बॉक्स घराच्या पार्किंग मधून जप्त केले. या घटनेची माहिती मिळताच मुख्य संशयित आरोपी दीपक जयसिंधानी याने पोबारा केला असून त्याला पकडण्यासाठी पथके रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.