शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कळवा खाडीतील ५७ झोपड्या जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 7:33 AM

रहिवाशांच्या विरोधानंतरही पालिकेची पोलीस बंदोबस्तात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा खाडीतील कांदळवन नष्ट करणाऱ्या बेकायदा झोपड्यांवर अखेर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ५७ झोपड्या तोडल्याची माहिती महापालिकेने दिली. या कारवाईला रहिवाशांनी विरोध केला. मात्र, पोलीस बंदोबस्तात कारवाई झाली. या कारवाईसाठी तहसील विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. 

खाडीलगत शेकडो बांधकामे उभी राहिली असून, त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत. खाडीकिनारी बेकायदा उभारलेल्या या झोपड्यांसंदर्भात कोकण विभागीय कार्यालयात बैठक झाली होती. यात खाडीपात्रात खारफुटीची कत्तल करून उभारलेल्या झोपड्यांवर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्याकडेही बैठक होऊन कारवाईबाबत निर्णय झाला.  सोमवारी ठाणे  जिल्हाधिकारी आणि मनपा यांनी कारवाईला सुरुवात केली. जुन्या ब्रिटिशकालीन कळवा उड्डाणपुलाच्या खाली, पोलीस आयुक्तालयाच्या समोर असलेल्या खाडीपात्रात ही कारवाई करण्यात आली. दिवसभरात ५७ झोपड्यांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ठामपाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली आहे.

‘पुन्हा खारफुटी लावण्यात येणार’कळवा खाडीपात्रात आणि आजूबाजूच्या परिसरात ५०० ते ७०० झोपड्या बेकायदा उभ्या राहिल्या आहेत. गेल्या २० वर्षांत या झोपड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या ठिकाणी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधाही दिल्या आहेत. या ठिकाणी कनेक्शन तोडायला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकारही यापूर्वी झाले आहेत. आता कोकण विभागीय कार्यालयाच्या निर्देशानंतर पुन्हा कारवाईला सुरुवात झाली असून, या ठिकाणी पुन्हा खारफुटी लावण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :thaneठाणे