शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

काशिमीरा येथे कारवाई विरोधात दगडफेक करणाऱ्या ६ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 8:45 PM

पालिकेने तोडली बेकायदे बांधकामे

लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - काशिमीरा येथे बेकायदा बांधकामे तोडन्यास पोलीस व बाऊंसरच्या बंदोबस्तात गेलेल्या पालिका पथकावर दगडफेक केल्या प्रकरणी चाळ माफिया मनोज चौहान सह सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. तर पालिकेने तेथील बेकायदा खोल्यांची बांधकामे पाडुन टाकली आहेत.ेंमाशाचा पाडा मार्ग व परिसरात इको सेंसेटिव्ह झोन, नाविकास क्षेत्रासह पालिका आरक्षण तसेच आदिवासी जमीनींवर मनोज चव्हाण आदी अन्य काही भुमाफियांनी प्रचंड प्रमाणात बेकायदा बांधकामे चालवली आहेत. प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे तसेच स्थानिक नगरसेवकां कडुन मात्र या बांधकामांना पाठीशी घातले जात असल्याचे आरोप होत आहेत. जेणे करुन या भागात दुसरी धारावी झोपडपट्टी तयार झाली आहे.आयुक्तां कडे तक्रारी गेल्या नंतर बुधवारी बोरसे व पालिका पथक पोलीस - बाऊंसरच्या ताफ्यासह ग्रीन व्हिलेज संकुल, तलावा शेजारी उद्यानाच्या आरक्षणात सुरु असलेल्या १० - १५ खोल्यांचे बांधकाम तोडण्यास गेले असता मोठ्या प्रमाणात दगडफेक केली गेली. त्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्या नंतर मनोज चौहान सह हय्युल जमाल, राजछबील पाठक, रमजान सुलेमान शेख, अशरफ शफीक यास्मीन व सोहेल इजराईल शेख यांना अटक करण्यात आली आहे. अन्य सुमारे १० ते १२ आरोपींचा शोध सुरु आहे.आरोपींची धरपकड पोलीस करत असतानाच दुसरीकडे महापालिकेने झालेल्या बेकायदा खोल्या पाडुन टाकल्या आहेत. परंतु सदरच्या खोल्या ह्या सिमेंट ब्लॉकने बनवलेल्या असुन सदरचे सिमेंट ब्लॉक चा सुध्दा जेसीबीने चूरा करणे आवश्यक होते. कारण सदर ब्लॉक पुन्हा बेकायदा बांधकामा साठी वापरले जातात असे नागरिकांनी बोलुन दाखवले.