शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

ठामपाने पार केलेला मालमत्ता कर वसुलीचा ६०० कोटींचा टप्पा; अभय योजनेचा ठाणेकरांनी घेतला लाभ

By अजित मांडके | Published: January 16, 2024 4:32 PM

मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थकबाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

ठाणे : मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान, थकबाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालमत्ता विभागाने १५ जानेवारीपर्यंत ६१० कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे. त्यात ११५ कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे. १५ डिसेंबरपासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अभय योजनेच्या काळात ४८.६४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे.

नागरिकांच्या प्रतिसादामुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६०० कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे. गेल्यावर्षी या कालावधीपर्यत ५६० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसुल झाला होता. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, मालमत्ता करातून मार्च-२०२४पर्यंत एकूण ७९२ कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

काही करदात्यांनी अद्यापपर्यत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ताधारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.   

कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे

करदात्यांनी अभय योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. पुढील १५ दिवस ५० टक्के दंडमाफीची सवलत सुरू राहणार आहे. मात्र, त्यानंतरच्या कालावधीत कर थकीत ठेवणाऱ्या करदात्यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल. यामध्ये मोठ्या थकबाकीदारांपासून सुरुवात करून कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येईल. शहर विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी वेळेत मालमत्ता कर भरण्याचे सामंजस्य नागरिकांनी दाखवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

अभय योजनेचा पुढचा टप्पा

जे करदाते १६ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणी व करावर आकारलेल्या शास्तीच्या ५०% रकमेसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या शास्तीवर ५०% सवलत देण्यात येणार आहे. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या करदात्यानी त्यांचा मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार नाही.

प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे

मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्रे सुरू करण्यात आली असूdन कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३०ते सायं. ५.००तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सर्व शनिवार सकाळी १०.३०ते दुपारी ४.००  व रविवार सकाळी १०.३०ते दुपारी १.३०या वेळेत कराचा भरणा करता येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच  Google Pay, PhonePe, PayTm, BhimAppयाद्वारे  करदाते ऑनलाईन पध्दतीने त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.तक्ता –१  (रुपये कोटींमध्ये)कालावधी    -           थकबाकी     - मालमत्ता कर     - एकूण कर०१.०४.२०२३ ते १४.१२.२०२३    -  ६७.०६    - ३९५.६८    - ४६२.७५१५.१२.२०२३ ते १५.०१.२०२४     -  ४८.६४    - ९९.४७    - १४८.११------------------------------------------------------------------------------------------                            एकूण    - ११५.७०    - ४९५.१५    - ६१०.८६ 

प्रभागसमिती निहाय झालेली वसुली

प्रभाग समिती -              एकूण वसुली    - टक्केवारी     उथळसर    -            ४०.५१    -           ७२%     नौपाडा कोपरी      -   ७९.११    -           ७६%       कळवा       -          २०.००      -         ५६%        मुंब्रा        -          ३६.२०          -     ७५%   दिवा        -                ३७.८१    -            ७३%वागळे इस्टेट    -          २३.००     -            ६८%      लोकमान्य सावरकर     - २३.९०     -    ६३%  वर्तकनगर            -         ९१.७०     -     ७१%माजिवडा मानपाडा     -  १९३.०१      -    ६९%मुख्यालय                -        ६५.६१       -    ८५%----------------------------------------------------------------------------------            एकूण            -                   ६१०.८६        -  ७७%