शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

किल्ले संवर्धनासाठी ६०० कोटी , मोदी सरकारकडून लोकहिताची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:49 AM

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. शनिवारी पूर्वेकडील नूतन विद्यामंदिर शाळेत भरवण्यात आलेल्या दोनदिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.भाजपाचे कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून शस्त्रसंग्रह करणाºया सुनील कदम यांचे या वेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी विशेष कौतुक केले. शिवाजी महाराज हे कल्याणमध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आरमार आणि किल्ले यासाठी महाराज नेहमी आग्रही होते. त्यांनी केलेली प्रत्येक लढाई ही महत्त्वाची होती. त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विविध शस्त्रांचा वापर करून लढाई जिंकली आहे, असे सांगताना चव्हाण यांनी हा इतिहास समजावा, म्हणून रायगडासह अन्य गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली.लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाने ज्याप्रमाणे काम केले, त्याप्रमाणे सध्याचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार काम करत आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य देशातील नागरिकांना अनुभवाला येईल, असा दावा चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. या वेळी आयोजक संजय मोरे, नाना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के, वैभव गायकवाड, हेमलता पावशे, सुमित्रा नायडू, कमल पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शाळकरी मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

टॅग्स :Fortगड