शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 12:30 AM

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखणार, अशी शक्यता वाटत होती. मात्र, भाजपनेच आव्हाडांना घेरण्यासाठी गनिमी कावा सुरू केला आहे. काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे ६०० हून अधिक स्वयंसेवक कळवा, मुंब्रा पिंजून काढत असून स्थानिकांसोबत गुप्त बैठका घेण्यावरही त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजप दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ६७ हजार ४५५ मते मिळाली. शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना या मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली. परंतु, विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. येत्या विधानसभा निवडणुकीत आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेकडून मागील निवडणुकीप्रमाणे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु, संघ परिवार व भाजप नेतृत्वावर टीकेचे प्रहार करणाऱ्या आव्हाडांना त्यांच्याच घरात घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची माहिती आहे. रा.स्व. संघ, भाजपविरोधात कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंह, हार्दिक पटेल यांनी मोर्चा उघडला होता. परंतु, त्या सर्वांचे आवाज भाजपने लोकसभा निवडणुकीत बंद करून टाकले. राज्यातील इतर कोणताही नेता हिंदुत्वाविरोधात थेट आवाज उठवत नाही, परंतु आव्हाड हे नेहमी भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात बोलत असल्याने आता त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने उचल खाल्ली आहे.भाजप आणि स्वयंसेवक संघाची मंडळी या भागात गुप्त बैठका घेत असून आव्हाड यांचे कच्चे दुवे हेरत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला १२ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे आता शिवसेनेला हाताशी घेऊन या मतदारसंघावर कब्जा करण्याची भाजपची तयारी आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. एमआयएमचा उमेदवार उभा करून मुस्लिम मतांचे विभाजन करणे शक्य आहे का, याचा आढावा स्वयंसेवक घेत आहेत. परंतु, शिवसेना हा मतदारसंघ सोडेल का, याबाबत चित्र स्पष्ट नाही. प्रस्ताव आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019