शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

आव्हाडांना घेरण्याकरिता ६०० स्वयंसेवक मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:23 PM

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघ । सेनेवर कुरघोडीचा प्रयत्न

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना घेरण्यासाठी शिवसेना व्यूहरचना आखणार, अशी शक्यता वाटत होती. मात्र, भाजपनेच आव्हाडांना घेरण्यासाठी गनिमी कावा सुरू केला आहे. काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे ६०० हून अधिक स्वयंसेवक कळवा, मुंब्रा पिंजून काढत असून स्थानिकांसोबत गुप्त बैठका घेण्यावरही त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजप दावा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये जितेंद्र आव्हाड यांना ८६ हजार ५३३ मते मिळाली होती, तर शिवसेनेला ३८ हजार ८५० मते मिळाली होती. एमआयएमला १६ हजार ३७४ आणि भाजपला १२ हजार ८१८ मते मिळाली होती. शिवसेना आणि भाजपची मिळून ५१ हजार ६६८ मते मिळाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला ६७ हजार ४५५ मते मिळाली.शिवसेनेच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. राष्टÑवादीचे बाबाजी पाटील यांना या मतदारसंघात ७७ हजार ३३६ मते मिळाली. परंतु, विधानसभेला आव्हाडांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत नऊ हजार १९७ मतांची घट झाल्याचे दिसून आले. येत्या विधानसभा निवडणुकीत आव्हाडांना घेरण्यासाठी शिवसेनेकडून मागील निवडणुकीप्रमाणे प्रयत्न सुरू होतील, अशी शक्यता वाटत होती. परंतु, संघ परिवार व भाजप नेतृत्वावर टीकेचे प्रहार करणाऱ्या आव्हाडांना त्यांच्याच घरात घेरण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याची माहिती आहे. रा.स्व. संघ, भाजपविरोधात कन्हैयाकुमार, दिग्विजय सिंह, हार्दिक पटेल यांनी मोर्चा उघडला होता. परंतु, त्या सर्वांचे आवाज भाजपने लोकसभा निवडणुकीत बंद करून टाकले. राज्यातील इतर कोणताही नेता हिंदुत्वाविरोधात थेट आवाज उठवत नाही, परंतु आव्हाड हे नेहमी भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात बोलत असल्याने आता त्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने उचल खाल्ली आहे.सेनेच्या मदतीने कब्जा करण्याचा मनसुबाभाजप आणि स्वयंसेवक संघाची मंडळी या भागात गुप्त बैठका घेत असून आव्हाड यांचे कच्चे दुवे हेरत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला १२ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे आता शिवसेनेला हाताशी घेऊन या मतदारसंघावर कब्जा करण्याची भाजपची तयारी आहे. त्यासाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. एमआयएमचा उमेदवार उभा करून मुस्लिम मतांचे विभाजन करणे शक्य आहे का, याचा आढावा स्वयंसेवक घेत आहेत. परंतु, शिवसेना हा मतदारसंघ सोडेल का, याबाबत चित्र स्पष्ट नाही. प्रस्ताव आल्यावर आम्ही आमची भूमिका मांडू, असे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे