- सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील सरकारी जमिनीवर ६९ हजार २३४ ठिकाणी विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तीन वर्षापूर्वी केवळ कागदी कारवाई करणारे जिल्हा प्रशासन आजही त्याकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे त्यांना शासकीय यंत्रणेचा धाक नसून या बांधकामांचे प्रमाण वाढतेच आहे.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये १९९५ पूर्वीची, त्यानंतर २००० पर्यंतची आणि २००१ नंतरच्या अशा ६९ हजार २३४ अतिक्रमणांची नोंद आढळली आहे. ही बांधकामे वेळीच हटवण्याऐवजी नोटीसा दिलेल्या अतिक्रमणधारकांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेऊन मालकी मिळविली, तर काहींनी कारवाईवर स्थगिती मिळविली आहे. नोव्हेंबर २०१३ पर्यंतच्या कारवाईनंतर प्रशासनाने त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे अतिक्रमणाचा आलेख वाढलेलाच दिसतोय. यानंतरही सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात प्रशासनाकडे अपील केलेले आहे. यावरून काही अतिक्रमणाची प्रकरणे अंशत: पात्र, काहीना अपात्र ठरवण्याची कारवाई २०१३ पर्यंत झाली. मात्र त्यानंतर याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे उघडकीस येते आहे.प्रशासनाने ठरविली १९,२७९ बांधकामे अपात्रजिल्ह्यातील २००१ पर्यंतच्या या अतिक्रमणामध्ये ठाण्यातील ३५४८६ बांधकामांसह कल्याणची ८७०५, भिवंडी -११८५५, शहापूर - ८७६, अंबरनाथ- १२३१२ अतिक्रमित बांधकामांचा समावेश आहे. या ६९२३४ अतिक्रमण केलेल्या बांधकामांपैकी ४९९५५ बांधकामे पात्र तर १९२७९ बांधकामे जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरविले ठरविली आहेत.
जिल्ह्यात सरकारी जमिनीवर ६९२३४ अतिक्रमणे
By admin | Published: November 04, 2015 10:59 PM