बदलापूर: बदलापुरात फसवणुकीचा मोठा गुन्हा घडला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त नफा मिळवण्याचे आम्हीच दाखवत फसवणूक करणाऱ्याने बदलापुरातील व्यक्तीचे तब्बल 67 लाखांची फसवणूक केली आहे.
बदलापूर पूर्व भागातील विनोद दमके यांची ही फसवणूक झाली असून त्यांनी फसवणूक झाल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. मार्च २३ ते २३ मे २०२४ या कालावधीत राजीव अंबानी याने आयसीआय सिक्युरिटी इंटरनॅशनल कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून दमके यांना त्यांच्या मोबाईलवरून बनावट ऍप द्वारे डिमॅट खाते उघडायला सांगितले. या ॲपची कोणतीही शहानिशा न करता दमके यांनी ॲपद्वारे वेगवेगळ्या कंपनीचे आयपीओ ची खरेदी केली. मात्र काही रक्कम जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याने अंबानी याने वाढीव रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांत पाठवायला सांगितले.
अश्या प्रकारे दमके यांच्याकडून ६७ लाख १० हजार रक्कम घेतल्यानंतर डी मॅट खाते दमके यांच्या संमतीशिवाय बंद करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा बदलापूर पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. आतापर्यंत ओटीपी द्वारे बँकेतील पैसे हडपणाऱ्यांचे अनेक प्रकार घडले होते. मात्र शेअर मार्केटमधील बोगस ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे एवढी मोठी फसवणूक केल्याचा प्रकार बदलापूरात पहिल्यांदाच घडला आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केला आहे.