उल्हासनगर : शहरातील भुयारी गटार योजनेला मुहूर्त लागल्यानंतरच कल्याण-अंबरनाथ रस्ता बांधणीला सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली आहे.
उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिकेने १०० फुटी रुंदीकरण केले. त्यानंतर रस्ता पुनर्बांधणीसाठी चार टप्प्यासाठी ६८ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात ३६ कोटीचा निधी मंजूर होऊन, सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या निविदा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात १० तर चौथ्या टप्प्यात २२ कोटीचा निधी असा एकून ६८ कोटीचा निधी रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी मंजूर झाला. तिसऱ्या व चौथा टप्प्यात मिळालेल्या निधीतील कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली. महापालिकेने या कामासाठी ना हरकतपत्र बांधकाम विभागाला दिल्याची माहिती महापालिका शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे. मात्र शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून रस्त्याच्या खालून जाणाऱ्या भुयारी गटारीचे काम झाल्यानंतर रस्त्याच्या पुनर्बांधणीला सुरवात होणार असल्याचे संकेत उपअभियंता मानकर यांनी दिली आहे.
शहरातील मुख्य कल्याण ते अंबरनाथ रस्त्यासाठी आलेला निधी पडून असून रस्ता बांधकामाला सुरवात झाली नसल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागावर टिका होत आहे. रस्ता बांधणीपूर्वी पाणी व भुयारी गटारीचे कामे करून घ्या, असे महापालिकेला कळविले आहे. गटारीच्या कामामुळे रस्त्याचे काम सुरू केले नाही. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनयकुमार मानकर यांनी दिली आहे. रस्त्या खालील भुयारी गटारीचे काम सुरू करण्याचे संकेत महापालिकेचे शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली आहे.
रस्ता पूर्णतः बंद करू नये...आयुक्त अजीज शेख
शहरातून जाणाऱ्या मुख्य कल्याण ते अंबरनाथ रस्त्या खालील भुयारी गटारीचे काम झाल्यानंतर, सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू करावे. मात्र रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवावी. १०० फूट रस्ता असल्याने, वाहतुकीस अडथळा येणार नाही.