शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एमपीएससीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली सात लाख ८० हजारांची फसवणूक: भामटयाला यवतमाळमधून अटक

By जितेंद्र कालेकर | Published: December 05, 2017 7:06 PM

महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे अमिष दाखवित ठाण्यातील तरुणाकडून सात लाख ८० हजार रुपये उकळणा-या अर्जूनकुमार राठोड या भामटयाला ठाणे पोलिसांनी यवतमाळमधून अटक केली आहे.

ठळक मुद्दे ठाण्याच्या नौपाडा पोलिसांची कारवाईपोलीस उपायुक्तांशी सौख्य असल्याची केली बतावणीअनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता

ठाणे: मुंबईतील अनेक पोलीस उपायुक्तांशी आपले सौख्याचे संबंध आहेत. त्यामुळे महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मी सहज उत्तीर्ण करुन देऊ शकतो, अशी बतावणी करुन ठाण्यातील काही तरुणाची सात लाख ८० हजारांची फसवणूक करणा-या अर्जूनकुमार राठोड (रा. पिंपळगाव, जि. यवतमाळ) याला नौपाडा पोलिसांनी यवतमाळ येथून सोमवारी रात्री अटक केली आहे.कळव्याच्या हरपितसिंग चिमा (३०) याने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पोलीस अधिकारी होण्यासाठी ठाण्यातील ‘क्लाईम्ब फस्ट’ या स्पर्धा परीक्षांसाठी असलेल्या खासगी क्लासमध्ये दहा हजार रुपये (तीन महिन्यांसाठी) भरुन प्रवेश घेतला होता. दीड महिना होऊनही शिकवलेले काहीच लक्षात येत नसल्यामुळे त्याने क्लासचे अर्जूनकुमार राठोड या शिक्षकांशी सपर्क साधला. सुरुवातीला राठोडनेच शिकविण्यास सुरुवात करुन घरगुती शिकवणी घेण्याचीही तयारी दर्शविली. त्यामुळे हरपितसिंग याच्यासह त्याचे मित्र बजरंग चौगुले, मन्नु टी आणि मयूर शेळके यांनी आॅक्टोबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ दरम्यान राठोड याच्या बदलापूरच्या मॅरेथॉन सिटी येथील घरी क्लासला सुरुवात केली. कालांतराने दोन महिने अचानक क्लास बंद झाला. पुढे एप्रिल २०१३ मध्ये राठोडने ठाण्याच्या पॅराडाईज टॉवर येथील दुस-या माळयावर ‘तांडा पब्लिकेशन अ‍ॅकेडमी’ नावाने क्लास सुरु केला. तिथे हरपितसिंग आणि त्याच्या मित्रांनी आठ महिन्यांच्या या क्लाससाठी ७५ हजार रुपये रोखीने भरुन प्रवेश घेतला. त्याचवेळी राठोडने मुंबईतील अनेक पोलीस उपायुक्त आपले भाऊबंद आहेत. त्यांच्याकडून मी तुम्हाला एमपीएससी परीक्षा पास करुन देतो, अशी बतावणी केली. त्याबदल्यात हरपितसिंग याच्याकडून जून २०१३ मध्ये एक लाख रुपये त्यापाठोपाठ २६ जुलै २०१३ रोजी ५० हजार रुपये, सप्टेंबर २०१३ आणि आॅक्टोबर २०१३ मध्ये अनुक्रमे दोन लाख आणि ५५ हजार रुपये असे सात लाख ८० हजार रुपये उकळले. त्यानंतर डिसेंबर २०१३ मध्ये मात्र राठोडने हा क्लासही बंद केला. पुढे अनेकदा तो पुढच्या महिन्यात तुझे काम नक्की करतो, असे सांगून तो हरपितसिंगला टोलवाटोलवी करीत होता. जानेवारी २०१६ नंतर त्याने फोनसह सर्व प्रकारचा संपर्क तोडला. वारंवार पाठपुरावा करुनही राठोडने पैसे किंवा नोकरीलाही न लावल्याने याप्रकरणी २८ फेब्रुवारी २०१७ रोजी हरपितसिंगने राठोडविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर, पोलीस नाईक शब्बीर फरास आणि योगेश चव्हाण यांच्या पथकाने राठोडला अखेर यवतमाळ जिल्हयातील पिंपळगाव येथून ४ डिसेंबर रोजी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याने आणखी अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेcrimeगुन्हेPolice Stationपोलीस ठाणे