शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

७० टक्के करून दाखवलेच नाही

By admin | Published: January 10, 2017 6:49 AM

ठाणे महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात

अजित मांडके / ठाणे ठाणे महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेल्या ‘वचनपूर्ती’ आणि ‘माझे ठाणे, सबकुछ ठाणे’ या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ७० टक्के आश्वासनांची गेल्या पाच वर्षांत पूर्तता झालेली नाही. काही कामांच्या निविदा निघाल्या आहेत, तर काही कामांची तेवढीही प्रगती झालेली नाही. ‘मोनो रेले’, ‘मनोरंजन केंद्र’, ‘तारांगण’, ‘इनडोअर स्टेडिअम’यासह अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी आजही कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे ‘करून दाखवले’ असे म्हणणाऱ्या शिवसेनेला ‘कधी करून दाखवणार’, असा सवाल करण्याची वेळ ठाणेकरांवर ओढवली आहे. शिवसेनेच्या वचननाम्यात २४ तास पाणी, रस्ते, वाहनतळ, पदपथ चौक, सार्वजनिक आरोग्य सुविधा, उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देऊ शकणाऱ्या खाजगी संस्थांना रुग्णालय उभारण्यास पालिकेचे आरक्षित भूखंड उपलब्ध करून देणे, अशी आश्वासने दिली होती. याखेरीज, शैक्षणिक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पुनर्विकास, घनकचरा, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व बालकल्याण, मैदान, उद्याने, क्रीडांगणे, नाट्यगृह, उद्योग, कामगार, अपारंपरिक ऊर्जास्रोत, नागरी प्रशासनात अधिकाधिक लोकसहभाग आदी जुन्या वचननाम्यातील बाबी नवा मुलामा देऊन समाविष्ट केल्या होत्या. यापैकी अनेक गोष्टी सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांना उपलब्ध करून देता आलेल्या नाहीत. मागील कित्येक वर्षे ज्वलंत असलेला डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न अद्यापही सत्ताधाऱ्यांना सोडवता आलेला नाही. डायघरची जागा जरी ताब्यात असली, तरी त्याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारता आलेला नाही.केवळ याला पर्याय म्हणून खर्डी येथील वनविभागाच्या जागेवर कचरा टाकण्यासाठी वनविभागाची अंतिम परवानगी मिळणे अद्यापही बाकी आहे.पालिका प्रशासनाने विविध प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काही प्रकल्प हाती घेतले असून यातील काही प्रकल्पांची कामे सुरूझाली आहे.ठाणेकरांसाठी २४ तास पाण्याचे नियोजन करण्याचे स्वप्न सत्ताधाऱ्यांनी दाखवले होते. परंतु, अद्यापही ते प्रत्यक्षात उतरवता आलेले नाही. नळावर मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी त्यासंदर्भातील काम निविदेच्या पुढे सरकू शकलेले नाही. पाण्याचे नियोजन करण्यासाठी मात्र वॉटर मीटर, वॉटर की-आॅक्स, वॉटर आॅडिट याबाबत निविदा आता काढल्या जात आहेत. वाहनतळांची समस्या अद्यापही तशीच आहे. ज्युपिटरजवळ बहुमजली पार्किंग सेंटर उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. इतर ठिकाणीदेखील तशा स्वरूपाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, त्याची गाडी म्हणावी तितकी पुढे सरकू शकलेली नाही. गावदेवी मैदानाखाली भुयारी पार्किंगचे घोडेही फारसे पुढे सरकलेले नाही. तारांगणचे काम कागदावरून फारसे पुढे सरकू शकलेले नाही. आॅस्ट्रेलियातील सिडनीच्या धर्तीवर कासारवडवली येथे ३० एकरांवर अत्याधुनिक इनडोअर स्टेडिअम उभारणाचे आश्वासन हरवले आहे.अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यालय उभे राहिलेले नाही.शासनाच्या सहकार्याने घोडबंदर परिसरात ३२० एकरांच्या जागेवर मनोरंजन केंद्र उभारणार, हे आश्वासन कागदावर आहे.युवकांना रोजगार, करिअरविषयक मार्गदर्शन करण्यासाठी विशेष केंद्र उभारणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, तेही कागदावरच राहिले आहे.अद्ययावत भाजी व मच्छी मार्केट उभारणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, विद्यमान भाजी मंडई आणि मच्छी मार्केटची अवस्था सुधारण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. त्यात घोडबंदर भागातील भाजी मंडईचे रूपांतर एसआरएच्या कार्यालयात झाले आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नागरी प्रशासन अधिकाधिक लोकसहभाग व्हावा आणि नागरिकांच्या समस्या या नगरसेवक पातळीवर सोडवल्या जाव्यात, यासाठी नगरसेवक प्रभाग सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही एकाही सभेचे आयोजन झालेले नाही.बेकायदा होर्डिंग्जपासून ठाणे मुक्त करणार असल्याचे सांगितले असले, तरी सध्या सत्ताधारी शिवसेना व भाजपामध्ये श्रेयासाठी पोस्टर वॉर सुरू असल्याने आपल्याच वचनाचा विसर सत्ताधाऱ्यांना पडला आहे. विटावा येथील रहिवाशांना रिक्षाने स्टेशनकडे येण्यासाठी खिशाला चाप बसत असल्याने आणि पाच मिनिटांच्या प्रवासासाठी वळसा घालून जावे लागत असल्याने सिडको बस स्टॉप ते छत्रपती शिवाजी रुग्णालय असा पादचारी पूल बांधण्यासाठी आता कुठे निविदा काढण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक भवनांची संख्या वाढवणार व त्यांच्यासाठी विशेष उपक्रम राबवणार, हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. भवनांची संख्या वाढलीच नाही आणि त्यांच्यासाठी फारसे नवे असे काहीच उपक्रम राबवले नाहीत. आजीआजोबा पार्कची संख्याही वाढू शकलेली नाही. महिलांना गृहउद्योग उभारण्यासाठी सावित्रीबाई फुले योजनेलाही फारशी गती अद्याप मिळू शकलेली नाही. ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला मेट्रोच्या कामाचा नारळ मात्र २४ डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते वाढवण्यात आला आहे. परंतु, त्याचे काम केव्हा पूर्ण होईल, याबाबत साशंकता आहे. महापालिका मोनो रेल्वे प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, ती आजही कागदावरच आहे. कळवा रुग्णालयात आजही रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. त्यात, महापालिका रुग्णालयात सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा कक्ष सुरू करणार असल्याचा दावा केला होता. तो कक्ष गेला कुठे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या २५ वरून पुढे सरक शकलेली नाही.