सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धाचे आज आयाेजन केले असता त्यातसाठी जिल्हाभरातील तब्बल ७०० दिव्यांग खेळाडूनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन आपल्या दिव्यांगावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा परिषदेने या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा २०२२-२०२३ जिमखाना, डोंबिवली येथील समाज कल्याण विभागात आयाेजित केल्या. शारिरीक सुदृढता, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाचे योगदान देणारी ठरली. मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या क्रीडा स्पर्धेचेे आयोजित केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व अति मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांच्या हस्ते या क्रीडा खेळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचेसंजय बागुल उपस्थित होते. उत्साही वातावरणात स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धच्या मैदानी खेळांमध्ये गोळा फेक, लिंबु चमचा, ५० मिटर धावणे, १०० मिटर धावणे आदी खेळ पार पडले. यातील विजेत्यां विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या स्पर्धेत १०० शिक्षकांनी व २०० पालकांनी देखिल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिदल म्हणाले ‘पुढच्या वर्षी उत्तमरित्या स्पर्धांचे आयोजन करू. त्यासाठी मैदानी खेळातील कौशल्य असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे, असे मार्गदर्शनही जिंदल यांनी शिक्षकांसह पालकांना केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"