ठाणे : जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड व भिवंडी या तीन तालुक्यातील ३१ ग्राम पंचायतींपैकी २५ ग्राम पंचायतींच्या सरपंचांसह १६७ सदस्यांसाठी मंगळवारी मतदान झाले. सुमारे ५० हजार २०८ मतदानापैकी ३.३० वाजेपर्यंत सुमारे ३२ हजार ६०० म्हणजे ६५ टक्के मतदान झाले आहेत. भिवंडीच्या पहारे ग्राम पंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज आलेला नसल्यामुळे तेथे मतदान होऊ शकले नाही.जिल्ह्यातील ३१ ग्राम पंचायतींपैक २५ ग्राम पंचायतींमध्ये मतदान झाले. उर्वरित पाच ग्राम पंचायतींपैकी काही बिनविरोध तर काही ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. तर पहारे ग्राम पंचायतींत यंदाही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे मतदान नाही. जिल्ह्यातील सरपंचांसह सदस्यांच्या ३०८ जागांपैकी १०५ जागां बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तर ३६ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे उर्वरित १६७ जागांसाठी ३.३० वाजेपर्यंत ६५ टक्के मतदान झाले तर संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत .... म्हणजे ... टक्के मतदान झाले आहे. मतमोजनणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.