कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे विकसीत करण्यात येणा:या सिटी पार्कची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिटी पार्कची निविदा 72 कोटी रुपये खर्चाची आहे. सिटी पार्कच्या प्रकल्पाची एकूण रक्कम शंभर कोटी रुपये इतकी आहे.
सिटी पार्कची निविदा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली आहे. 2010 साली पार पडलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केलेल्या निवडणूकीच्या जाहिरनाम्यात सिटी पार्क उभारण्याची घोषणा केली होती. सिटी पार्क उभारण्याच्या जाहिर नाम्याची पूर्तता करण्यासाठी 2012 मध्ये तत्कालीन शिवसेनेच्या महापौर वैजयंती घोलप यांनी सिटी पार्कचा विषय मंजूर केला होता. विषय मंजूर झाल्यावरही त्याची पूर्तता होत नव्हती. सिटी पार्कचा प्रकल्प हा 1क्क् कोटीचा रुपये खर्चाचा असल्याने त्यासाठी महापालिकेकडे पैसा नव्हता. त्यामुळे सिटी पार्कचा विषय हा कागदावरच राहिला होता. 2क्15 सालच्या निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली होती. त्या पश्चातही प्रकल्पाच्या मार्गाला चालना मिळळेली नव्हती. सिटी पार्क करण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला. मात्र 2017 साली महापालिकेची आर्थिक कोंडी झाल्याने प्रकल्पासाठी पुन्हा पैसा कुठून आणणार असाच विषय पुढे आला. महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत शहर विकासासाठी 2 हजार 300 रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. मात्र त्यात सिटी पार्कचा विषय नव्हता. सिटी पार्क आत्ता स्मार्ट सिटी प्रकल्पात अंतभरूत करण्यात आले. तसा ठराव करण्याची मागणी शिवसेनेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी महासभेत मांडली होती. त्यांच्या मागणीनुसार ठराव मंजूर करण्यात आला होता. सिटी पार्कसाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदेची रक्कम 72 कोटी रुपये इतकी आहे. पहिल्या टप्प्यात 72 कोटी रुपयांची निवीदा काढण्यात आली आहे. दुस:या टप्प्यात 28 कोटी रुपयांची निविदा काढणो अपेक्षित आहे. चौकट-सिटी पार्कमध्ये काय आहे ?कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेला असलेल्या हद्दीलगत उल्हास नदी शेजारी महापालिकेचा आरक्षित भूखंड आहे. या भल्या मोठय़ा भूखंडावर सिटी पार्क विकसीत केले जाणार आहे. नदी किना:यालगत संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. लॅण्डस्केप आणि गार्डर्निंग केले जाणार आहे. त्याठिकाणी एक बॉटीनिकल गार्डन विकसीत करण्यात येणार आहे. पाण्याचे मनमोहर कारंजे उभारले जाईल. त्याठिकाणी लेझर शो तयार केला जाणार आहे. सर्व सोयी सुविधांयुक्त सभागृह असेल. चौकट-पूरक विकास काय आहे ?कल्याण पश्चिमेला वाडेघर, उंबर्डे, सापाड या ठिकाणी विकास परियोजनेअंतर्गत विकास केला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर सुनियोजीत विकास केला जाणार आहे. हा विकास सिटी पार्कला पूरक ठरणार आहे. त्याचबरोबर कल्याण खाडी किनारा विकसीत करण्यात येणार आहे. सिटी पार्क प्रमाणोच शिव आरमार स्मारक उभारले जाणार आहे. ते दुर्गाडी खाडी किनारी विकसीत करणो प्रस्तावित आहे.