शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

कुपोषणमुक्तीसाठी ७५ लाख

By admin | Published: October 07, 2016 5:40 AM

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका व परिसरातील आदिवासी कुपोषित बालकांचा गंभीर प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणल्यावर रायगड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले

जयंत धुळप / अलिबागरायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका व परिसरातील आदिवासी कुपोषित बालकांचा गंभीर प्रश्न ‘लोकमत’ने ऐरणीवर आणल्यावर रायगड जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्ह्यात तीव्र कुपोषित २४१ तर ९५८ कुपोषित बालके निष्पन्न झाली आहेत. जिल्ह्यातील आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून आदिवासी उपयोजनांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्र माच्या माध्यमातून २५ लाख रुपयांचा तर आदिवासी उपयोजनेमधून ५० लाख रु पये असा एकूण ७५ लाख रुपयांचा निधी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता यांच्या मान्यतेने तातडीने उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिली आहे.नावीन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) आणि बाल उपचार केंद्र (सीटीसी) यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या उपचारासाठी निधी दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रु ग्णालय या ठिकाणी २१ दिवस सॅम (तीव्र कुपोषित) आणि मॅम (कुपोषित) बालकांना दाखल करण्यात येईल. त्यांच्यावर योग्य उपचार केले जातील. जिल्हा परिषद यंत्रणा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत ही योजना राबविली जाणार आहे. यात व्हीसीडीसी अंतर्गत १२०० रु. प्रति बालक प्रति महिना तर सीटीसीअंतर्गत ५२५० रु.प्रति बालक प्रति महिना खर्च होणार आहे. जिल्ह्यात सध्या तीव्र कुपोषित(सॅम) २४१ तर कुपोषित(मॅम) ९५८ कुपोषित बालके आहेत. आदिवासी विकास योजनेअंतर्गत भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत २५ लाख रुपये तर अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थ्यांना अंडी व केळी वाटप यासाठी २५ लाख असा एकूण ५० लाख रु पयांचा निधी देण्यात आला.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनाच्ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थी गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल. एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. अंगणवाडी आणी मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दूध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला आदींचा समावेश राहाणार आहे.५ हजार २१४ बालकांकरिता अमृत आहार : अमृत आहार योजना कर्जत तालुक्यात सुरु असून यात एकूण १३५ अंगणवाडी व मिनी अंगणवाडी आहेत. तर ४६० गरोदर महिला, ५१७ स्तनदा माता आणि ७ महिने ते ७ वर्षे या वयोगटातील ५ हजार २१४ बालके असून त्यांना या योजनेचा लाभ होत आहे. जिल्ह्यात कुपोषण दूर करण्यासाठी प्रशासन सतर्कतेने व गांभीर्यतेने पावले उचलत असून केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम येत्या काही दिवसात निश्चितपणे दिसून येईल,असा विश्वास जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी अखेरीस व्यक्त केला आहे.