सदानंद नाईक,उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्यातील आसाडे गाव हद्दीत खरेदी केलेल्या जमिनीच्या वादातून बांधकाम व्यावसायिक राजेंद्र लोढा यांची ८० लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून हिललाईन पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर शेजारील आसाडे गाव हद्दीत मॅक्रोटेक डेव्हलपर्सचे राजेंद्र नरपतमल लोढा यांनी सन-२०१४ साली २ हजार चौ.मी. जमीन खरेदी केली. मात्र याबाबत वाद निर्माण झाल्याची तक्रारी बांधकाम व्यावसायिक लोढा यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर, पोलिसांनी प्रमिला, विशाल व तुषार पाटील यांच्यावर ८० लाख फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. लोढा यांनी ४ हजार ८५० पैकी २ हजार चौ.मी. क्षेत्रफळ जमीन एकून ८० लाख किमतीतून खरेदी केली.
जमिनीचा विकास केल्यानंतर लोढा व पाटील यांच्यात जमिनीबाबत वाद निर्माण झाला. यातूनच फसवणुकीचा गुन्हा झाला आहे. अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत.